लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. पण देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण करून देशप्रेमाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. या उपक्रमाची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे.‘कॅट’ नागपूर चमू राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांच्या नेतृत्वात दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करते. भरतीया म्हणाले, आज युवकांना योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे. प्रेम व्यक्त करणे, हा गुन्हा नाही, पण त्यात सभ्यता असावी. पर्यावरणावर प्रेम करताना पशु, पक्षी, झाडे, नदीला लाल फूल अर्पण करून प्रेम व्यक्त करता येते. याचप्रकारे आमचे दुकान, व्यापार, ग्राहक या सर्वांप्रति प्रेम व्यक्त करता येते. तसेच आईवडील, भाऊबहिण यांच्याप्रति पे्रम व्यक्त करता येऊ शकते. युवकांनी संस्कृतीचे जतन करून प्रेमाचा संदेश सर्वत्र द्यावा.‘कॅट’ नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर यांनी व्हॅलेंटाईन डे सार्वत्रिक साजरा करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. संघटन मंत्री निखिलेश ठाकर यांनी भारताच्या संस्कृतीला खुल्या डोळ्याने स्वीकार करण्याचे आवाहन केले. महिला विंग अध्यक्षा आशा पांडे म्हणाल्या, तरुणाईने भारतमातेवर प्रेम करून सैनिकांचे मनोबल वाढविले पाहिजे. यावेळी अनू उपाध्यक्ष, माया मंडाले, भानुमती कोचे, स्वप्ना तलरेजा, पायल खरोले, अर्चना रस्तोगी, अनिता रामप्रसाद, रेखा चतुर्वेदी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रभाकर देशमुख, फारूक अकबानी, प्रकाश जैस, रामअवतार अग्रवाल, अनिता रामप्रसाद, जयश्री गुप्ता, विठोबा शेंडे, स्वर्णिमा सिन्हा उपस्थित होते.
नागपुरात व्यापाऱ्यांतर्फे आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 9:44 PM
‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. पण देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण करून देशप्रेमाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला.
ठळक मुद्दे ‘कॅट’ : भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण