एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेस बोलावले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील, कार्याध्यक्ष बी.बी.पाटील, सरचिटणीस रमेश बलैया, उपाध्यक्ष रवी रोटे, सचिव अशोक तुगीडवार उपस्थित होते. वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजुरीबाबतचा ठराव संचालक मंडळाच्या फेब्रुवारी २०१९ च्या बैठकीत संमत झाल्याचे त्यांनी सांगितले. सुधारित वेतन संरचनामुळे २०१६ ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची थकबाकी आस्थापना खर्च अंदाजे २५ कोटी रुपये नियोजनाच्या दृष्टीने सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षात सामाविष्ट करण्यात आले. शासन स्तरावरून सातवा वेतन आयोग मंजूर होताच लगेच कर्मचाऱ्यांना देण्याबाबतची प्रक्रिया करू असे आश्वासन एन.वासुदेवन यांनी दिले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम तसेच गर्दी करणारी आंदोलने करण्यात येऊ नये असे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून आंदाेलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती रमेश बलैया यांनी दिली.
वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदाेलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:10 AM