गाडगेनगर प्रभाग सुधार समिती प्रभाग २८ च्या वतीने गाडगेनगर मैदानात झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नंदनवनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख, ओबीसी महासंघाचे समन्वयक शरद वानखडे, सामाजिक कार्यकर्ता परमेश्वर राऊत, प्रभाकर ढोबळे उपस्थित होते. देशभक्तीपर गीत कृष्णा वैद्य, शर्वरी समरी,त खुशी बांधते यांच्या चमूने सादर केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक देवकर, उपनिरीक्षक भवाळ, तिडके, सुनील सरदार, हरमेश परमार आणि पोलीस कर्मचारी हजर होते. चंदा राऊत, गजानन कांबळे, जगनाडे, किशोर क्षीरसागर, नरेंद्र टिकणे, गमे गुरुजी, ठाकरे, वैद्य यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन केवलराम शेळके यांनी केले. आभार राहुल खैरकर यांनी मानले.
.........
जीएसटी कार्यालय ()
राज्य वस्तू व सेवा कर कार्यालय (जीएसटी) येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अप्पर राज्य कर आयुक्त डॉ. वैजनाथ कमठेवाड यांनी राष्ट्रध्वज फडकविला. कार्यक्रमात डॉ. कमठेवाड, राज्य कर सहआयुक्त सुनील लहाने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जीएसटी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.......
दिघोरी चौक ()
दिघोरी उड्डाणपूल चौक येथे डॉ. प्रकाश ढगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम भिवापूरकर, डॉ. उमेश भिवापूरकर, डॉ. प्रदीप गुप्ता, डॉ. प्रमेय ढगे, डॉ. वर्षा गुप्ता, कपिल पटेल, नरेश गोडे, मदन नागपुरे, डॉ. राहाटे, भाऊराव ढोक, राजू घिनमिने व दिघोरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................
देवांजली हाऊसिंग सोसायटी, रेशीमबाग ()
रेशीमबाग येथील देवांजली हाऊसिंग सोसायटीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रा. प्रकाश निमजे, समाजसेविका विजया भुसारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोसायटीच्या महिला मंडळाने देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाला सचिव प्रदीप पांडे, कोषाध्यक्ष प्रेम पोरकुटे, संजू जयस्वाल, प्रेरणा पांडे, वनिता पोरकुटे , दीपाली निमजे, मेघा क्षीरसागर, आशा चौधरी, प्रणिता पोरकुटे उपस्थित होत्या. संचालन संजू जयस्वाल यांनी केले. आभार प्रदीप पांडे यांनी मानले.
...........