इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात ३०० जागा जिंकेल
By कमलेश वानखेडे | Published: June 1, 2024 02:12 PM2024-06-01T14:12:36+5:302024-06-01T14:13:02+5:30
नाना पटोले यांचा दावा : ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न !
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा उतरला आहे. राहुल गांधी यांनी जी भूमिका जनतेसमोर मांडली, पदयात्रा केली, जनतेचा आवाज काँग्रेस सोबत होता.लोकांचा प्रतिसाद होता..मोठया प्रमाणात देशात समर्थन केले, ते निकालातून दिसेल. इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात तीनशेवर जागा जिंकेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले,इंडिया आघाडी लोकांच्या आशीर्वादाने बहुमत मिळेल. तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होईल, यावर आज चर्चा नाही. ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न आहे. तटकरे कुठे आहे, मला त्यावर चर्चा करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पिण्याचे पाणी नाही, शेती पीक नष्ट झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सत्तेतील लोकांना का दिसत नाही. जनावरांना चारा नाही त्याची काळजी का नाही, दुधाचा भाव घसरला आहे. असे असताना मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने सत्ताधारी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
नागपूरात सुद्धा अशीच घटना घडली, जळगाव मध्ये त्यापेक्षा मोठी घटना झाली. गर्भश्रीमंत साठी वेगळा न्याय आणि गरिबांसाठी वेगळा न्याय आहे. जनतेचा जीव सुरक्षित नाही. अग्रवाल बिल्डरला वाचविण्यासाठी कुणी प्रयत्न केले याचे पुरावे आहे. योग्य वेळी खुलासे करू,सरकार लपावा छपवी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कोनीही सहन करु शकत नाही, पण मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न होत आहे त्या भाजपचा विरोध आहे, असेही पटोले म्हणाले. बियाने विक्रीत काळाबाजार होत आहे, त्याला सरकार मधील मंत्र्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आहे.शेतकरी उन्हात उभे राहून बियान्यासाठी रांगा लावत आहे, याकडे सरकारचे लक्ष नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त के