शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

प्लास्टिक निर्मूलनासाठी ‘इंडिया प्लॉग रन’ बुधवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 8:22 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कें द्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी उद्या बुधवारी २ ऑक्टोबरला महापालिका मुख्यालयासह सर्व दहा झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशहरात प्लास्टिक निर्मूलनाचा जागर : देशातील ५२ शहरामध्ये नागपूरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कें द्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी उद्या २ ऑक्टोबरला महापालिका मुख्यालयासह सर्व दहा झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’अभियान राबविण्यात येत आहे. सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत अभियान राबविले जाणार असून यात धावपटू, खेळाडू व विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक सहभागी होतील. इंडिया प्लॉग रन अभियानाला जनआंदोलन स्वरुपात राबविले जाणार आहे.इंडिया प्लॉग रन अभियान देशातील ५२ शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. यात नागपूर शहराचा समावेश असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर आयुक्त राम जोशी, स्वच्छ भारत अभिानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.महापालिकेतर्फे ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्लास्टिक निर्मूलनासाठी झोन कार्यालय, शाळा, महाविद्यालये, दुकाने, बाजार आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली. पुढचा टप्पा म्हणून आज बुधवारी इंडिया प्लॉग रनचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलनाचा जागर करण्यात येणार आहे. प्लॉग रनमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय शहरातील स्केटिंग व दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडूही या अभियानामध्ये सहभागी होऊ न प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती करतील.प्लॉग रन दरम्यान मनपा मुख्यालय व झोन परिसरात प्लास्टिक निर्मूलनासाठी आयोजित कार्यक्रमस्थळी मनपाच्या प्लास्टिक संकलन करणाऱ्या गाड्या उपलब्ध राहतील. प्लास्टिक निर्मूलनाबाबत जनजागृती केली जाईल. तसेच प्लास्टिक संकलित करून ते प्रक्रियेसाठी पाठविण्यात येईल.आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लॉग रनमध्ये सहभागी व्हावे व यापुढे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन अभिजित बांगर यांनी केले आहे.प्लॉग रनचे असे राहील वेळापत्रकसकाळी ६.३० ते ७ वाजता - प्लास्टिक गोळा करणे, किट वितरणसकाळी ७ ते ७.२० वाजता - डिटॉक्स युवर माईंड अ‍ँण्ड बॉडी या संकल्पनेवर योगा आणि ध्यान सत्रसकाळी ७.२० ते ७.३० वाजता - यावेळेत वेळेवर येणारी आवश्यक माहिती दिली जाईलसकाळी ७.३० ते ९ वाजता - डिटॉक्स अवर नेबरहूड या संकल्पनेवर प्लागिंग सत्रसकाळी ९ ते ९.३० वाजता - कचऱ्याची विल्हेवाट लावणे, प्लास्टिक निर्मूलनाची प्रतिज्ञाप्लॉग रनची झोन स्तरावरील ठिकाणेलक्ष्मी नगर - धंतोली उद्यान, सावरकर नगर चौकधरमपेठ - अंबाझरी उद्यान, वर्मा ले-आऊटहनुमान नगर - दुर्गा नगर स्कूल, जवाहन नगर परिसरधंतोली - सुभाष रोड उद्याननेहरूनगर - दत्तात्रय नगर उद्यानगांधीबाग - गांधीबाग उद्यान मार्के टसतरंजीपुरा - शांतिनगर उद्यान, शांतिनगर परिसरलकडगंज - आंबेडकर उद्यान, आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यूआसी नगर - वैशाली नगर उद्यानमंगळवारी - मंगळवारी बाजार, जरीपटका मार्केटमॉलमध्ये कापडी पिशव्या उपलब्ध करणारप्लास्टिक मुक्तीसाठी शहरातील मॉलमध्ये बंद असलेल्या प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी कापडी व कागदी पिशव्या बचत गटाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी मॉल व महिला बचत गट यांच्या समन्वय साधला जाईल. अशी माहिती अभिजित बांगर यांनी दिली.१००७ लोकांवर कारवाईप्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविली जात आहे. सोबतच बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते. उपद्रव शोध पथकाने १००७ लोकांवर कारवाई करून ५० लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका