शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

इंडियन रोड काँग्रेस : रस्त्यावर उतरवा सुखोई किंवा उंची ठेवा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 9:38 PM

रस्ते आणि पुलांच्या बांधकामासंदर्भात देशात अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. आता साध्या रस्त्यावर सुद्धा सुखोइ सारखे लढाऊ विमान उतरवले जात आहे. तसेच रस्ते बांधत असताना त्याची उंची सातत्याने वाढत असते. त्यामुळे रस्ते वर आणि आजूबाजूची घरे खाली अशी परिस्थिती निर्माण होते. त्यातून लोकांच्या घरात पाणी साचते. ही अलीकडे देशात सर्वच शहरांची समस्या झाली आहे. परंतु आता रस्ते दुरुस्ती करताना त्याची उंची आहे तीच ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे रस्त्यावर सुखोई उतरवा किंवा उंची कायम ठेवा सर्वच शक्य आहे, याचा प्रत्यय मानकापूर स्टेडियम येथे सुरूअसलेल्या इंडियन रोड काँग्रेसचे तांत्रिक प्रदर्शन पाहिल्यावर निश्चित येतो.

ठळक मुद्देरस्ते व पूल बांधकामातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते आणि पुलांच्या बांधकामासंदर्भात देशात अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. आता साध्या रस्त्यावर सुद्धा सुखोइ सारखे लढाऊ विमान उतरवले जात आहे. तसेच रस्ते बांधत असताना त्याची उंची सातत्याने वाढत असते. त्यामुळे रस्ते वर आणि आजूबाजूची घरे खाली अशी परिस्थिती निर्माण होते. त्यातून लोकांच्या घरात पाणी साचते. ही अलीकडे देशात सर्वच शहरांची समस्या झाली आहे. परंतु आता रस्ते दुरुस्ती करताना त्याची उंची आहे तीच ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे रस्त्यावर सुखोई उतरवा किंवा उंची कायम ठेवा सर्वच शक्य आहे, याचा प्रत्यय मानकापूर स्टेडियम येथे सुरूअसलेल्या इंडियन रोड काँग्रेसचे तांत्रिक प्रदर्शन पाहिल्यावर निश्चित येतो.

या प्रदर्शनात देशातीलच नव्हे तर जगभरातील रस्ते व पुलासह एकूण स्थापत्य अभियांत्रिकीतील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे वर अलीकडेच सुखोई विमान उतरवण्यात आले. 
‘व्हर्च्युअल फिल’ देणारा समृद्धी महामार्गनागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. एमएसआरडीसीच्या स्टॉलवर या महामार्गाची संपूर्ण माहिती उपलब्ध आहेच. परंतु या स्टॉलवर आल्यास आपल्याला समृद्धी महामार्गावर चालत असल्याचा भास होतो. असा ‘व्हच्युूअल फिल’ देणारा महामार्ग या स्टॉलवर तयार करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा पुढील नियोजित टप्प्याचा देखावाही आकर्षणाचे केंद्र आहे. नितीन गडकरी यांनी स्वत: याची पाहणी केली. 
रस्त्याच्या मजबुतीसाठी ज्यूटचा वापरनिसर्गाच्या मदतीने स्वस्त आणि मजबूत रस्ते बनवता येऊ शकतात. यासाठी ज्यूटची मदत घेतली जात आहे. प्रदर्शनात नॅशनल ज्यूट बोर्डचे प्रिंसपल टेक्नोलॉजिस्ट प्रदीप चौधरी यांनी सांगितले की, ज्यूटचा वापर करून तयार होणारे रस्ते अधिक काळपर्यंत टिकतात. यात खड्डेही पडत नाहीत. यामुळे रस्त्याचा वरचा भाग आणि जमिनीखाली एक मजबूत लेयर बनवली जाते. 
‘सायकल ट्रॅक’ काळाची गरजप्रदर्शनात नागपूर बेस्ड कंपनी कॅटेलाईनचे अभिजित मोहरील आणि आदित्य शाह यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीमधील ज्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे तयार होत आहेत तिथे सायकल ट्रॅक बनवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कंपनीने हॉलेंडच्या कंपनीसोबत तंत्रिक करार केला आहे. या अंतर्गत विशेष मटेरियल वापरून सायकल ट्रॅक तयार केला जातो. यावर सायकल ६० किमी प्रतितास वेगानेही चालविता येऊ शकते. अधिक वेगाने असूनही सायकल स्लीप होणार नाही. पावसातही सायकल सहजपणे चालू शकते. यासाठी सायकल खरेदी करण्याची गरज नाही. मेट्रो स्टेशनजवळच सायकल स्टेशनही उपलब्ध राहतील. सायकलचा जितका वपर केला जाईल, तितकेच शुल्क वसूल केले जाईल. 
वळणमार्गावरील अपघातात जीवहानी टळणारमहामार्गावरील वळणमार्ग हे सर्वात धोकादायक. बहुतांश अपघात वळण मार्गावरच होतात. यात मोठ्या प्रमाणावर जीवहानी होत असते. परंतु आता अशा वळणमार्गासाठी अ‍ॅडोर कंपनीने विशिष्ट पॉवर ट्रॉन आणले आहे. वळणमार्गावर हे लावल्यास कुठलेही वाहन १२० किमी प्रति तास वेगाने याला धडकले तरी वाहनाचे नुकसान होईल, परंतु वाहन पलटी खाणार नाही. वळणमार्गाला धडकून वाहन पूर्वस्थितीत येईल, गती मंद होईल. त्यामुळे वाहनचालकाच्या जीवाला धोका होणार नाही. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर