शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

गोरेवाड्यातील ‘इंडियन सफारी’ दिवाळीपर्यंत खुली होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 9:52 AM

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रािणसंग्रहालयात ‘इंडियन सफारी’अंतर्गत ‘एन्ट्रन्स प्लाझा’, अस्वल सफारी व बिबट सफारीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही सफारींमध्ये वन्यप्राणी स्थलांतरित करण्याची पूर्वतयारी सुरू आहे.

ठळक मुद्देएन्ट्रन्स प्लाझा’, अस्वल सफारी व बिबट सफारीचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘इंडियन सफारी’चे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांचे स्थानांतर करून दिवाळीपर्यंत ही सफारी पर्यटकांसाठी खुली करण्याच्या दिशेने नियोजन करण्यात येईल, असे वनमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी वनविकास महामंडळाला सूचना दिल्या आहेत. वनविकास महामंडळाच्या सभागृहात गुरुवारी गोरेवाडा प्रकल्पाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रािणसंग्रहालयात ‘इंडियन सफारी’अंतर्गत ‘एन्ट्रन्स प्लाझा’, अस्वल सफारी व बिबट सफारीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही सफारींमध्ये वन्यप्राणी स्थलांतरित करण्याची पूर्वतयारी सुरू आहे. तसेच वाघ व तृणभक्षी प्राण्यांच्या सफारीचे काम प्रगतिपथावर आहे. ही कामे मागील वर्षी नोव्हेंबरमध्येच पूर्ण होणे अपेक्षित होती. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ‘इंडियन सफारी’तील टायगर सफारी व ‘हर्बिवोरस सफारी’ची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. ‘एन्ट्रन्स प्लाझा’, अस्वल सफारी व बिबट सफारी लवकरच वनविकास महामंडळाकडे हस्तातंरित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय