लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उड्डाणासाठी तयार असलेले इंडिगो एअरलाईन्सचे ६ई ४०३ नागपूर-कोलकाता विमान बुधवारी सायंकाळी तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर थांबविण्यात आले. विमान उड्डाणासाठी तयार होते. इंजिनही सुरू झाले होते. जवळपास ३.३० तास विलंबानंतर प्रवाशांना इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने कोलकाताला पाठविण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सायंकाळी नागपूर-कोलकाता विमान ७.५५ वाजता उड्डाणासाठी धावपट्टीवर तयार होते. त्यावेळी वैमानिकाला विमान बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रवाशांना उतरविण्यात आले. त्यामुळे प्रवासी निराश झाले. पण सुरक्षेच्या कारणामुळे निर्णय घेतल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. त्यानंतर त्यांना विमानतळावर उभे असलेल्या इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने रात्री ९.३० वाजता कोलकाताला पाठविण्यात आले. हे विमान प्रशिक्षणाच्या उद्देशाने गेल्या पाच दिवसांपासून नागपूर विमानतळावर उभे आहे. तांत्रिक बिघाडासंदर्भात इंडिगोच्या विमानतळावरील काऊंटरवर संपर्क केला असता कर्मचाऱ्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.दोन विमानांना उशीरइंडिगोचे ६ई २०१८ नागपूर-दिल्ली विमान ४५ मिनिटे उशिराने सकाळी ९.५० वाजता आणि ६ई २०२ नागपूर-दिल्ली विमान ४५ मिनिटे विलंबाने रात्री ८.४५ वाजता रवाना झाले.
इंडिगोचे उड्डाणासाठी तयार विमान थांबले : तांत्रिक बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:59 AM
उड्डाणासाठी तयार असलेले इंडिगो एअरलाईन्सचे ६ई ४०३ नागपूर-कोलकाता विमान बुधवारी सायंकाळी तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर थांबविण्यात आले. विमान उड्डाणासाठी तयार होते. इंजिनही सुरू झाले होते. जवळपास ३.३० तास विलंबानंतर प्रवाशांना इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने कोलकाताला पाठविण्यात आले.
ठळक मुद्देदुसऱ्या विमानाने पाठविले प्रवासी