संवादातून उभारता येईल भारत-पाक मैत्रीचा सेतूपाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित : ‘इंडिया अॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’चे आयोजननागपूर : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे. दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘लोकमत नॉलेज फोरम’अंतर्गत आयोजित ‘इंडिया अॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रादरम्यान मुख्य वक्ता म्हणून ते शुक्रवारी बोलत होते.भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालणाऱ्या शांतिप्रक्रियेला वैचारिक बळ प्रदान करण्यासाठी आयोजित या चर्चासत्राला थायलंड, म्यानमार व अफगाणिस्तान येथील भारताचे माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी, काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी, ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई हे प्रामुख्याने उपस्थित होते.भारत पाकिस्तानदरम्यान शांतिवार्ता होणे आवश्यक आहे. पाकिस्तानमधील काही शक्तींना वाटते की चर्चा व्हायला नको आणि तेथील अस्थिर व्यवस्थेमुळे नेमके कुणाशी बोलावे असा भारतासमोर संभ्रम निर्माण होतो, असे प्रतिपादन शेषाद्री चारी यांनी केले. दोन्ही देशांनी त्यांचे समान हित कशात आहे हे शोधून वाटचाल करणे हाच शांतता निर्माण करण्याचा उपाय आहे, असे स्पष्ट मत विवेक काटजू यांनी व्यक्त केले. गेल्या ६९ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करायला हवा. संबंध सुधारण्यासाठी चर्चेसोबतच हिंदी सिनेमा, संंस्कृती यांच्यासारख्या बाबींचादेखील उपयोग व्हायला हवा, असे प्रियंका चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या.जतीन देसाई म्हणाले, दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी जनतेमधील परस्पर संबंध वाढवायला हवे. नागरिकांना मिळणाऱ्या ‘व्हिसा’ची संख्या वाढवायला हवी. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या भांडणातून दोन्ही देशांचे खूप मोठं नुकसान झालं आहे. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात,' असे मत लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान व्यक्त केले. ‘लोकमत’चे ‘नॅशनल एडिटर’ हरीश गुप्ता यांनी यावेळी जनतेच्यावतीने मान्यवरांना विविध प्रश्न विचारले. ‘लोकमत समाचार’चे ‘प्रोडक्ट हेड’ मतिन खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्रा यांनी आभार मानले. मुख्य समारंभानंतर यावेळी विशेष चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते.विजय दर्डा यांची सूचना स्वागतार्ह ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अब्दुल बासित यांनी कौतुक केले. विजय दर्डा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासोबत मोरोक्को दौऱ्यावर असल्यामुळे ते उपस्थित नाहीत. त्यांची अनुपस्थिती जाणवते आहेच. विजय दर्डा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना दोन्ही देशांनी एकत्रित येऊन एका मनोरंजन वाहिनीची सुरुवात करावी, अशी सूचना केली होती. त्यांच्या या सूचनेचे स्वागत करून यासाठी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.शेषाद्री चारी, काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी, ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई हे प्रामुख्याने उपस्थित होते.भारत पाकिस्तानदरम्यान शांतिवार्ता होणे आवश्यक आहे. पाकिस्तानमधील काही शक्तींना वाटते की चर्चा व्हायला नको आणि तेथील अस्थिर व्यवस्थेमुळे नेमके कुणाशी बोलावे असा भारतासमोर संभ्रम निर्माण होतो, असे प्रतिपादन शेषाद्री चारी यांनी केले. दोन्ही देशांनी त्यांचे समान हित कशात आहे हे शोधून वाटचाल करणे हाच शांतता निर्माण करण्याचा उपाय आहे, असे स्पष्ट मत विवेक काटजू यांनी व्यक्त केले. गेल्या ६९ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करायला हवा. संबंध सुधारण्यासाठी चर्चेसोबतच हिंदी सिनेमा, संंस्कृती यांच्यासारख्या बाबींचादेखील उपयोग व्हायला हवा, असे प्रियंका चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या.जतीन देसाई म्हणाले, दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी जनतेमधील परस्पर संबंध वाढवायला हवे. नागरिकांना मिळणाऱ्या ‘व्हिसा’ची संख्या वाढवायला हवी. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या भांडणातून दोन्ही देशांचे खूप मोठं नुकसान झालं आहे. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात,' असे मत लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान व्यक्त केले. ‘लोकमत’चे ‘नॅशनल एडिटर’ हरीश गुप्ता यांनी यावेळी जनतेच्यावतीने मान्यवरांना विविध प्रश्न विचारले. ‘लोकमत समाचार’चे ‘प्रोडक्ट हेड’ मतिन खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्रा यांनी आभार मानले. मुख्य समारंभानंतर यावेळी विशेष चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते.विजय दर्डा यांची सूचना स्वागतार्ह ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अब्दुल बासित यांनी कौतुक केले. विजय दर्डा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासोबत मोरोक्को दौऱ्यावर असल्यामुळे ते उपस्थित नाहीत. त्यांची अनुपस्थिती जाणवते आहेच. विजय दर्डा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना दोन्ही देशांनी एकत्रित येऊन एका मनोरंजन वाहिनीची सुरुवात करावी, अशी सूचना केली होती. त्यांच्या या सूचनेचे स्वागत करून यासाठी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.
संवादातून उभारता येईल भारत-पाक मैत्रीचा सेतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2016 2:30 AM