नागपूर : महाराष्ट्रात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आता निवासी औद्योगिक कॉलनींना घरगुती दराने पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमएडब्ल्यूआरआरए) च्या सदस्य (अर्थतज्ज्ञ) श्वेताली ठाकरे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अशाच प्रकारे राज्यातील पाण्याच्या स्रोतवार दरांमध्येही एकरूपता आणली असल्याचे त्या म्हणाल्या.
श्वेताली ठाकरे या लोकमतशी विशेष चर्चा करताना बोलत होत्या. त्या म्हणाल्या की प्राधिकरणचे राज्याला शाश्वत व स्थायी जलसुरक्षा प्रदान करण्याचे लक्ष्य पुढे ठेवून काम करीत आहे. त्याचबरोबर पाणी दराचेही निर्धारण करीत आहे. २०२२ मध्ये प्राधिकरणाने २०२५ पर्यंत पाण्याचे दर निश्चित केले आहे. यात उद्योगांसाठी विशेष तरतूद केली आहे. सिंचनासाठी प्रति एकर एक हजार लिटर १५ पैसे दर निश्चित करण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी सरासरी ६२ पैसे एक हजार लिटर व उद्योगासाठी १३ रुपये प्रति एक हजार लिटर दर निश्चित केले आहेत. उद्योगांना ७५ टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जात आहे. त्याचबरोबर उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या कॉलनींना घरगुती दरात पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केले की केवळ पाणीपुरवठ्याचाच पैसा घेतला जात आहे, त्यातून कुठलाही लाभ कमविल्या जात नाही. त्या म्हणाल्या की पाण्याच्या दरांच्या बाबतीत प्राधिकरणाने अभ्यास सुरू केला आहे. एसटीपी व ईटीपी परिणामांवर मंथन करण्यात येणार आहे. यासाठी सरकारच्या अन्य एजन्सीचीही मदत घेण्यात येत आहे.
- कमी झाले दर
श्वेताली ठाकरे म्हणाल्या की राज्यात प्रत्येक नागरिकाला माफक दरात पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधिकरण कटिबद्ध आहे. प्राधिकरणाचे गठण झाल्यानंतरच पाण्याच्या दरात सवलती मिळाल्या आहेत. उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचे तर घरगुती पाण्यासाठी २ ते ३ टक्के व उद्योगासाठी १ टक्के खर्च येतो. सिंचनासाठी ७५ टक्के सबसिडी दिली जात आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवारसारख्या योजनांवर काम सुरू आहे. त्याचबरोबर पाण्यासंदर्भातील वादविवादही कमी झाले आहे. आता वर्षाला पाण्यासंदर्भातील १५ ते २० प्रकरण प्राधिकरणाकडे येतात.
- टिश्यूपेपरने नव्हे, पाण्याने करावे हात स्वच्छ
श्वेताली ठाकरे यांनी पाणी बचत करणे व पाण्याचा अतिरेक थांबविण्यावर जोर दिला. त्यांनी आवाहन केले की टिश्यू पेपरने नाही, तर पाण्यानेच हात साफ करावे. टिश्यू पेपर बनविण्यासाठी भरपूर पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे पाण्याने हात धुतल्यास पाण्याची बचत होईल. त्याचबरोबर आपल्या दिनचर्येत आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.