शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

-तर उद्योजक रस्त्यावर उतरतील

By admin | Published: July 11, 2016 2:39 AM

औद्योगिक क्षेत्रात आणि व्यावसायिक भागांत कामगारांना मारहाण, लूट, उद्योजकांकडून खंडणीची मागणी, कंपनीतून साहित्याची चोरी, ...

नेत्यांच्या जन्मदिनाच्या नावावर वर्गणीरूपी खंडणी : कंपन्या त्रस्तनागपूर : औद्योगिक क्षेत्रात आणि व्यावसायिक भागांत कामगारांना मारहाण, लूट, उद्योजकांकडून खंडणीची मागणी, कंपनीतून साहित्याची चोरी, महिला कामगारांची छेडछाड असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यात परिसरातील आरक्षित जागेत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसल्या आहेत. यामुळे औद्योगिक परिसर असुरक्षित झाला आहे. उद्योजक आणि कामगारांना असंख्य अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्योजक, मालक व व्यवस्थापकावर जबरदस्ती आणि गुंडगिरीच्या बळावर खंडणी किंवा हप्ता वसूल केला जात आहे. यावर नियंत्रण न आणल्यास उद्योजक व व्यापारी रस्त्यावर उतरतील, अशी प्रतिक्रिया उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.उद्योजकांना ‘टार्गेट’ करणे चुकीचेबुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर यांनी सांगितले की, सर्वच खंडणीखोर कोणत्या तरी पक्षांशी जुळलेले असतात. त्यांच्या नेत्यांचा जन्मदिन असला की वृत्तपत्रात जाहिरात, रक्तदान शिबिर वा अन्य कार्यक्रमाकरिता वर्गणीसाठी उद्योजकांना टार्गेट करतात. कार्यकर्त्यांना दम देण्याची त्या त्या पक्षांच्या नेत्यांची नैतिक जबाबदारी असते. पण नेतेही कार्यकर्त्यांच्या कृत्यावर आळा घालण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देतात. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यास ते सुद्धा कारवाई करीत नाही. अशा सर्व प्रकारात उद्योजकांना चुप्पी साधावी लागते. बुटीबोरीत कार्यकर्त्यांची भरमार आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते लहानसहान कारणांकरिता वर्गणी मागण्यासाठी उद्योजकांशी संपर्क साधतात. बहुतांश वेळी ते कायदा हातात घेतात. हे चुकीचे आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. पोषक वातावरण राहावेपोषक वातावरण राहिल्यास नवीन उद्योग येतील आणि रोजगाराची द्वारे खुली होतील. अशा प्रकारामुळे औद्योगिक परिसराची बदनामी होते. त्यामुळेच उद्योजक विस्तारीकरणासाठी मागे-पुढे पाहतात. विविध पक्षांच्या संघटनांमुळे बुटीबोरी येथील इंडोरामाने आपले दोन विस्तारित युनिट बाहेर नेले. त्यामुळे त्यावर आधारित छोटे पॅकेजिंग उद्योग बंद पडले. शिवाय नवीन विस्तारित प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास २५०० युवकांना रोजगार मिळाला नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास बुटीबोरी औद्योगिक परिसरात सीएट कंपनीचा प्रकल्प तीन महिन्यांपूर्वी सुरू झाला. सध्या २० टक्केच उत्पादन सुरू झाले आहे. या काळातच विविध पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या संघटनांचे बोर्ड कारखान्यावर लावले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन आणि एचआर व्यवस्थापक त्रस्त आहे. जवळपास ४०० कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प तीन टप्प्यात उभा राहणार आहे. कारखाना सुरू होताच संघटनांचा त्रास होऊ लागल्याने पुढे विस्तार होईल का, हा प्रश्न आहे. त्यामुळे युवकांना रोजगार मिळणार नाही आणि ‘मेक इन इंडिया’चे ध्येय साध्य होणार नाही. अशा घटनांवर वेळीच आळा घातल्यास या परिसराचा विकास होईल, अन्यथा उद्योजकांना रस्त्यावर यावे लागेल, असे लोणकर यांनी सांगितले.