लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांचे जगणे मुश्किल करणारी आणि कित्येकांची फसवणूक करणारी कुख्यात ठगबाज महिला प्रीती दास हिने अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शनिवारी सकाळी ११ वाजता प्रीती दास स्वत:च्या वकिलांसोबत पाचपावली पोलिस ठाण्यात हजर झाली. तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता प्रीतीच्या पापाचा हिशेब तपासण्याची सुरुवात केली आहे.पोलिस अधिकाऱ्यांसोबत मैत्री करून त्यांच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या प्रीतीने पोलिसांच्या दक्षता समितीसह अनेक कथित सामाजिक संघटनेच्या समित्यांवर आपली वर्णी लावून घेतली होती. पोलिसांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ती समोर राहायची आणि तेथे पोलिस अधिकाऱ्यांसोबत स्वत:चे फोटो काढून घ्यायची. हे फोटो वेगवेगळ्या लोकांना दाखवून ती सावज जाळ्यात ओढत होती. आपले अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत घनिष्ठ संबंध असल्याची थाप मारुन ती पोलीस ठाण्यात कोणतेही काम अडले तर मला सांगा, मी करून देते, अशी बतावणी करायची. त्याबदल्यात संबंधिताकडून मोठी रक्कम उकळायची. तिने गुंडांची आणि नेत्याची एक फळी निर्माण करून पोलीस अधिकाऱ्यांनाही ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. महिला असल्याचा गैरफायदा घेत ती कुणावरही दबाव आणायची. बलात्काराच्या गुन्'ात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी उकळायची. कुणाची रक्कम वसूल करून देण्याची किंवा कुणाच्या घर किंवा जमिनी वर कब्जा मारण्याचीही प्रीती सुपारी घेत होती. तिच्या धाकामुळे लकडगंजमधील एका मेस चालकाने आत्महत्या केली होती. मात्र तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीशी असलेल्या सलगीमुळे हे प्रकरण दडपले होते. प्रीतीच्या पापाचा भंडाफोड होताच तिच्याविरुद्ध पाचपावली, लकडगंज आणि जरीपटका या तीन पोलिस ठाण्यात गेल्या आठवड्यात एकापाठोपाठ गुन्हे दाखल झाले. त्यानंतर प्रीतीने पोलीस अधिकाऱ्यांशी असलेली सलगी कॅश करूननिसटून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला प्रत्येकानी झिडकारल्यामुळे ती हताश झाली आणि अखेर तिने शनिवारी सकाळी ११ वाजता पाचपावली पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ठाणेदार नगराळे यांनी तिची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर तिला अटक केली.बघ्यांची मोठी गर्दी!कुख्यात प्रीती पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे कळताच तिला बघण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, हे विशेष!
नागपुरात कुख्यात प्रीती दासची अखेर शरणागती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 4:37 PM
शनिवारी सकाळी ११ वाजता प्रीती दास स्वत:च्या वकिलांसोबत पाचपावली पोलिस ठाण्यात हजर झाली. तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता प्रीतीच्या पापाचा हिशेब तपासण्याची सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देब्लॅकमेलिंग, ठगबाजीचा गुन्हे पोलिसांनी अटक केली