उमरेड/ काटाेल/ हिंगणा/ कळमेश्वर/ रामटेक/ कुही// कन्हान : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये काेराेना संक्रमण कायम असल्याचे दिसून येते. काेराेनाने उमरेड तालुक्यात उचल घेतली असून, शुक्रवारी (दि. ४) २५ नवीन रुग्ण आढळून आले. काटाेल तालुक्यात १२, हिंगण्यात ८, कळमेश्वरात ४, रामटेक व कुही तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला तर कन्हान परिसरात एकाही नवीन रुग्णाची नाेंद करण्यात आली नाही.
उमरेड तालुक्यातील २५ रुग्णांमध्ये १७ रुग्ण शहरातील तर ९ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या ९१२ झाली असून, यातील ७६९ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, ३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काटाेल तालुक्यात एकूण ११६ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली असून, यातील १२ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात २ रुग्ण शहरातील असून १० रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील दाेन रुग्णांमध्ये गळपुरा व जानकीनगरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात शुक्रवारी ८ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ३,५९३ झाली आहे. यातील ३,३५१ रुग्ण काेराेनामुक्त झाले असून, ८३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वानाडाेंगरी व वडधामणा येथील प्रत्येकी दाेन, किन्ही, डिगडाेह, नीलडाेह व हिंगणा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात चार नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, ते चारही रुग्ण कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील आहेत.
रामटेक व कुही तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाची नाेंद करण्यात आली. रामटेक तालुक्यातील पाॅझिटिव्ह रुग्ण हा नगरधन येथील आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ८५२ झाली असून, यातील ७६६ रुग्णांनी काेराेनावर मात केली तर ३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुही तालुक्यात एकूण १८ जणांची टेस्ट करण्यात आली असून, यात एक जण पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. पाॅझिटिव्ह रुग्ण हा कुही शहरातील रहिवासी आहे.
---
कन्हान ‘नाे पाॅझिटिव्ह’
पारशिवनी तालुक्यातील कांद्री (कन्हान) येथील सेंटरमध्ये शुक्रवारी १९ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली. त्यात एकही जण पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. कन्हान प्राथमिक आराेग्य केंद्राच्या हद्दीमध्ये आजवर काेराेनाच्या एकूण ८४४ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यातील ८०१ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या २० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.