राजीव सिंह
नागपूर : नागरिकांचा संयम आणि नियमांच्या कठाेर पालनाने नागपूर शहरातील संक्रमणाचा दर बऱ्याच कालावधीनंतर एक अंकी आकड्यावर पाेहचल्याने शहरवासीयांना माेठा दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. शनिवारी केवळ ७.६७ टक्के नमुने संक्रमित असल्याचे आढळून आले. या दिवशी एकूण १०,०८१ नागरिकांनी काेराेना चाचणी केली, त्यापैकी केवळ ७७४ नमुने पाॅझिटिव्ह आढळून आले.
विशेष म्हणजे ही संख्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापेक्षा चांगल्या स्थितीत पाेहचल्याचे चिन्ह आहेत. त्यावेळी २६ फेब्रुवारी ते ४ मार्चच्या दरम्यान ५०,५९१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यामधून ५८७२ नमुने म्हणजे सरासरी ११.६१ टक्के नमुने संक्रमित आढळून आले हाेते. शहरात मागील ५ दिवसात संक्रमणाचा दर १३.९५ वरून घसरत ७.६७ वर पाेहचला आहे. मात्र हा दिलासादायक दर टिकविण्यासाठी आताही नियमांचे कठाेरतेने पालन करण्याची गरज आहे, नाहीतर पुन्हा संक्रमण वाढायला वेळ लागणार नाही. शहरात स्थिती दिलासा देणारी असली तरी ग्रामीण भागात चिंताजनक स्थिती अद्याप कायम आहे. शनिवारी तर ग्रामीणच्या आकड्यांनी परिसीमा गाठली. या दिवशी १५३० नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ज्यामधून ७२४ नमुने पाॅझिटिव्ह आढळून आले. म्हणजे संक्रमणाचा दर ४७.३२ टक्के राहिला. ग्रामीणमध्ये संक्रमणाच्या दरात समानता नाही. १० मे राेजी ३४.७० टक्के, ११ मे ला १८.४४ टक्के, १२ मे राेजी २५.५८ टक्के, १३ मे राेजी २७.५८ टक्के, १४ मे राेजी २६.०८ टक्के आणि १५ मे राेजी ४७.३२ टक्के संक्रमणाचा दर आढळून आला.
आतापर्यंत १८.१२ टक्के पाॅझिटिव्ह
नागपूर जिल्ह्यात ११ मार्च २०२० राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण सापडला हाेता. त्यानंतर संक्रमण वाढतच गेले. आतापर्यंत जिल्ह्यात २५ लक्ष ४९ हजार ७१८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ज्यामधून ४ लाख ६२ हजार ११० नमुने पाॅझिटिव्ह आढळून आले. याचाच अर्थ १८.१२ टक्के नमुने पाॅझिटिव्ह आले.
शहरात संक्रमणाची स्थिती
तारीख पॉझिटिव्ह संक्रमण दर
२६ फेब्रुवारी ते ४ मार्च ५०५९१ ५८७२ ११.६१
५ मार्च ते ११ मार्च ४८१६१ ८७०० १८.०६
१२ मार्च ते १८ मार्च ६४९०३ १५६७५ २४.१५
१९ मार्च ते २५ मार्च ७५१९९ १८९३३ २५.१८
२६ मार्च ते १ एप्रिल ६८२५२ १५६८३ २२.९७
२ एप्रिल ते ८ एप्रिल ७३२५३ २०७३२ २८.०३
९ एप्रिल ते १५ एप्रिल ९७०५७ २७५२३ २८.३६
१६ एप्रिल ते २२ एप्रिल १०४४६० ३२६४६ ३१.२५
२३ एप्रिल ते २९ एप्रिल १२३४३४ ३०००३ २४.३१
३० एप्रिल ते ६ मे ११०६०२ १९९७७ १८.०६
७ मे ते १२ मे ७३६०० ८८४६ १२.०२
नागपूर शहरातील संक्रमण दर
तारीख टेस्ट पाॅझिटिव्ह टक्केवारी
१० मे ११९९९ १३७१ ११.४२
११ मे ९७६८ १३६३ १३.९५
१२ मे १२४१० १३१९ १०.६२
१३ मे ११९०८ ११६३ ९.७६
१४ मे १०८८९ ११३२ १०.३९
१५ मे १००८१ ७७४ ७.६७
नागपूर ग्रामीणमधील संक्रमण दर
तारीख टेस्ट पाॅझिटिव्ह टक्केवारी
१० मे ३३११ ११४९ ३४.७०
११ मे ४६९६ ८६६ १८.४४
१२ मे ४७५१ १२०० २५.५८
१३ मे ३८०६ १०५० २७.५८
१४ मे ३२६२ ८५१ २६.०८
१५ मे १५३० ७२४ ४७.३२