शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

ग्रामीण भागात संक्रमणाचा दर १२ टक्क्यांवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:08 AM

सावनेर/ काटोल/ उमरेड/ कळमेश्वर/ कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर शहरात कोरोनाची लाट ओसरत असताना ग्रामीण भागात संक्रमणाचा दर अद्यापही ...

सावनेर/ काटोल/ उमरेड/ कळमेश्वर/ कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर शहरात कोरोनाची लाट ओसरत असताना ग्रामीण भागात संक्रमणाचा दर अद्यापही १२ टक्क्यांपर्यंत कायम आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ४,९२४ चाचण्यांपैकी ५७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७,९७९ इतकी आहे. शुक्रवारी ग्रामीण भागातील १,७९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागात आतापर्यंत १,३९,०४३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,२८,५०४ रुग्ण बरे झाले आहेत, तर २,२३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सावनेर तालुक्यात १६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील एक, तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. उमरेड तालुक्यात २६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४, तर ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. काटोल तालुक्यात ४७३ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत २९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील ४, तर ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्रांतर्गत १२, कोंढाळी (४), तर येनवा केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ९ रुग्णांची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात २२ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर शहरातीस ९, तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात दहेगाव, खापरी, आदासा येथे प्रत्येकी दोन, तर भंडागी, बुधदा, तेलकामठी, तिडंगी, नादीखेडा, उबगी, सोनेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

कुही तालुक्यात ३७२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही व मांढळ येथे प्रत्येकी एक, तर वेलतूर व तितूर येथे प्रत्येकी चार रुग्णांची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात ४८२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत ५२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. वानाडोंगरी येथे १७, डिगडोह (१०), हिंगणा (५), घोडेघाट (४), निलडोह व टाकळघाट येथे प्रत्येकी ३, खैरीपन्नासे, मांगली, इसासनी, पांजरी येथे प्रत्येकी २, तर मोहगाव व वडधामना येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ११,६५३ इतकी झाली आहे. यातील १०,६६३ कोरोनामुक्त झाले, तर २६२ रुग्णांचा मृत्यू झाला.

रामटेकला दिलासा

रामटेक तालुक्यात शुक्रवारी केवळ तीन रुग्णांची नोंद झाली. रामटेक शहरात एकाही रुग्णाची नोंद नाही. बाधित तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ६,४६४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६,१५६ कोरोनामुक्त, तर १२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.