सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/मौदा/ हिंगणा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र तेरा तालुक्यांचा संक्रमणाचा दर अद्यापही १८.४४ टक्के इतका आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४,६९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ८६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता २,०८५ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १,३१,८३४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,०६,५४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सोमवारी ही संख्या २,६९० इतकी होती. ग्रामीण भागात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३,१२९ इतकी आहे. कामठी तालुक्यात ३१९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सावनेर तालुक्यात मंगळवारी ५४ रुग्णाची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ५ तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. मौदा तालुक्यात १९२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १६ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले.
नरखेड तालुक्यात ५९ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील ४ तर ग्रामीण भागातील ५५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,२३५ तर शहरात ४७२ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात ११, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र १, मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र २ तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ४१ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ३१८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील १५ तर ग्रामीण भागातील ४२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्रातील २५, कोंढाळी केंद्र ९ तर येनवा केंद्राअंतर्गत ८ रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ३७५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ८६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे सर्वाधिक २८ रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात २३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १६ तर ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात १६ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील ५ तर ग्रामीणमधील ११ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,३५६ रुग्णांची नोंद झाली. यातील ५,०३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,३२५ इतकी आहे. कुही तालुक्यात २५७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात मांढळ व व तितूर येथे प्रत्येकी एक रुग्णाची नोंद करण्यात आली.
कळमेश्वरात बाधितांचा ग्राफ वाढला
जिल्ह्यातील इतर तालुक्यात बाधितांची संख्या कमी होत असली तरी कळमेश्वर तालुक्यात ७६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रात ३९ तर ग्रामीण भागात ३७ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागात धापेवाडा हे गाव हॉटस्पॉट ठरले आहे.