सावनेर/कळमेश्वर/कामठी/हिंगणा/नरखेड/काटोल/कुही/रामटेक/कन्हान : जिल्ह्यातील ग्रामीण भागात गाव तिथे कोरोनाचे संक्रमण, अशी स्थिती निर्माण झाली आहे. १३ तालुक्यात गुरुवारी ८८० रुग्णांची नोंद झाली. यात १९६ रुग्ण एकट्या सावनेर तालुक्यातील आहेत. यात शहरातील ७७ तर ग्रामीण भागातील ११९ रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यात १२३ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात धापेवाडा (४१), तेलकामठी (१२), पानउबाळी (८), उपरवाही (३), भडांगी, परसोडी, घोराड येथे प्रत्येकी दोन तर वाढोणा, सोनपूर, तिष्टी, बेल्लोरी, वरोडा, मडासावंगी, सावंगी, बोरगाव बु., दहेगाव, गोंडखैरी, आष्टीकला, पारडी, कोहळी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल तालुक्यात संक्रमणाचा वेग कायम आहे. गुरुवारी तालुक्यात ६० रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४१ तर ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. शहरात जानकीनगर येथे दहा पंचवटी, लक्ष्मीनगर, रेल्वेस्टेशन परिसरात प्रत्येकी चार, धंतोली (३), नबीरा ले-आऊट, वडपुरा येथे प्रत्येकी दोन तर राठी ले-आऊट, खंते ले-आऊट, सरस्वतीनगर, शारदा चौक, लाखे ले-आऊट, कडू ले-आऊट, आययूडीपी, फल्ली मार्केट, दोडकीपुरा, पेठबुधवार, घोडे ले-आऊट येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण कोंढाळी येथे पाच, इसापूर-खुर्द (४), वंडली (वाघ), लाडगाव येथे दोन तर गोंडीदिग्रस, कलंबा, परसोडी, घरतवाडा, आजनगाव, येनवा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात २७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७१ तर शहरातील ४६ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात सावरगाव येथे ११, जलालखेडा (१०) तर मेंढला येथे एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात कुही, मांढळ, वेलतूर व साळवा येथे ७९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथे ३१ रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात २१ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील रामाळेश्वर वॉर्ड येथे दोन, राधाकृष्ण वॉर्ड, जयप्रकाश वॉर्ड, शिवाजी वॉर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात परसोडा येथे ९, मनसर (२) तर शीतलवाडी, देवलापार, वाहिटोला, बोथिया पालोरा, भोजापूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ८४ रुग्ण
हिंगणा तालुक्यात गुरुवारी ९३० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील २७, हिंगणा (१०), डिगडोह (८), कान्होलीबारा व गुमगाव येथे प्रत्येकी ७, टाकळघाट (६), इसासनी ४), वागदरा (३), नीलडोह व कोतेवाडा येथे प्रत्येकी २ तर वडधामना, रायपूर, शिरुर, टेंभरी, नागलवाडी, गिदमगढ, डिगडोह पांडे व सावंगी आमगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ४,८५१ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४,०५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.