भारतात आंबा हे सर्वात लोकप्रिय फळ आहे. फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध या आंब्याची जगात ख्याती आहे. वर्षभर लोक आंब्यांची वाट बघत असतात , नागपुरातील कळमना मार्केट सध्या आंब्यांच्या ढिगांनी सजलेले आहे. यंदा अवकाळी पावसामुळे आंब्यांवर मंगु रोग आल्यामुळे या आंब्यांचे दार घसरले आहेत.
५० ते ६० रुपये विकला जाणारा आंबा आता फक्त ३० ते ४० रुपयांच्या दरात मार्केटमधून फळविक्रेत्यांना विकला जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांपर्यंत हा आंबा आता ५० ते ६० रुपये किलो च्या दराने पोहोचत आहे. नागपुरात हे आंबे कर्नाटक वरून येत आहेत, तर नागपूरच्या कळमना मार्कटमधून या आंब्यांची उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , ओडिशा, छत्तीसगड आणि नेपाळ सह विविध राज्यांमध्ये विक्री होत आहे. एका गाडीत किमान ५ ते १० टन अशाप्रकारे किमान १५० ट्र्क आंबा दररोज कळमना मार्केट मध्ये उतरवला जात आहे.