शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

कोरोना रुग्णांना रिक्त खाटांची माहिती द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. मेडिकल, मेयो व अन्य शासकीय रुग्णालयात रुग्णांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. मेडिकल, मेयो व अन्य शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातील उपलब्ध रिक्त खाटांची माहिती कोरोना नियंत्रण कक्षातून देण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

महापौर, आयुक्त यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे यांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर येथील कोरोना नियंत्रण कक्षाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे आदी उपस्थित होते.

कोरोनासंदर्भातील रुग्णालयांची माहिती हवी असेल तर ती नागरिकांना दिली जाते. शहरातील कुठल्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, यासह पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनाही फोनद्वारे विचारपूस करण्यात येते. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ही भीती घालविण्यासाठी नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून व्हायला हवे. आता या कोरोना नियंत्रण कक्षातून विधानसभा क्षेत्रनिहाय आणि झोननिहाय विचारणा करून त्यानुसार जवळच्या कोविड रुग्णालयात उपलब्ध खाटा तसेच रिक्त खाटांची अद्ययावत माहिती कोरोना केंद्रातून द्यावी, अशी सूचना महापौर व आयुक्तांनी केली.

...

झोन कार्यालयसंपर्क क्रमांक

लक्ष्मीनगर झोन -०७१२-२२४५०५३

धरमपेठ झोन -०७१२-२५६५५८९

हनुमाननगर झोन -०७१२-२७५५५८९

धंतोली झोन -०७१२-२४६५५९९

नेहरूनगर झोन -०७१२-२७०२१२६

गांधीबाग झोन -०७१२-२७३९८३२/२७३९९००

सतरंजीपुरा झोन -०७१२-२९५८२३५ मो.नं. ७०३०५७७६५०

लकडगंज झोन -०७१२-२७३७५९९

आशीनगर झोन-०७१२-२५६५६०५

मंगळवारी झोन -०७१२-२५९९९०५/२५९६९०४

केंद्रीय नियंत्रण कक्ष-०७१२-२५६७०२१/२५५१८६६