शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

इन्फोसिसचे कार्यालय पाहिले आणि जीवनाचे ध्येय ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2016 3:08 AM

अमरावतीला इंजिनिअरिंग झाल्यावर आमचे कुटुंब पुण्याला स्थलांतरित झाले. अभियंता झाल्यावरही जीवनाचे ध्येय ठरले नव्हते.

नागपूर : अमरावतीला इंजिनिअरिंग झाल्यावर आमचे कुटुंब पुण्याला स्थलांतरित झाले. अभियंता झाल्यावरही जीवनाचे ध्येय ठरले नव्हते. काही जॉब करावा म्हणून एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब मिळविला. या कंपनीजवळ इन्फोसिसचे आॅफिस होते. एकदा कंपनीतून बाहेर निघताना इन्फोसिसची बिल्डींग दृष्टीस पडली आणि मी वेडावलो. आपली स्वत:ची अशीच बिल्डींग असावी हे स्वप्न मला दिवसा पडायला लागले. या बिल्डींगमुळे माझ्या आयुष्याचे ध्येय ठरले.प्रयास-सेवांकूर संस्थेतर्फे चिटणवीस सेंटर येथे ‘अलग राह’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण उद्योजक मंगेश वानखेडे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांनी मुलाखत घेतली. याप्रसंगी वानखेडे यांनी बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. आईवडिल शेतमजुरीचे काम करायचे. लहानपणापासूनच अठरा विश्वे दारिद्र्य जवळून अनुभवले. अशात घरच्यांचा विरोध बाजूला ठेवून वडील सैन्यात भरती झाले. वडिलांची पोस्टींग अलाहाबादला झाल्याने आम्ही तेथे गेलो. तेथेच पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. मात्र वर्षभरात वडिलांची आसामला पोस्टींग झाल्याने परत अमरावतीला आलो. येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. काही समजत नव्हते. मात्र काही शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास सुकर झाला. पुढे दहावी, बारावी आणि अभियांत्रिकीचे शिक्षण अमरावतीलाच झाले. त्यानंतर आमचे कुटुंब पुण्याला राहायला गेलो. मंगेश वानखेडे म्हणाले, आयटीचा विद्यार्थी म्हणून मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी मिळाली. तब्बल १९ महिने काम केल्यावर मात्र कामावरून मन उडाले. काय करतो, असे वाटायचे. आपार्किंग समस्येवर संशोधनसद्यस्थितीत सर्वच शहरे पार्किंग समस्येने बेजार आहेत. त्यामुळे शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी संशोधन करायचे हे आम्ही ठरविले. दोन वर्षात संशोधन करून एक टेक्निक तयार केले. २२०० चौरस फुट जागेवर १०० च्या वर गाड्या पार्क करण्याचे हे तंत्र होते. भारत सरकारकडून त्याचे पेटंटही घेतले आहे. मात्र अनेक महिने या संशोधनाकडे कुणी लक्ष दिले नाही. मोठे अधिकारी आणि नेत्यांनाही भेटलो मात्र कुणी दखल घेतली नाही. आपल्या देशात युवकांनी संशोधन करावे, असे भाषणात बोलले जाते. प्रत्यक्षात संशोधनाला प्रोत्साहन दिले जात नाही. अशातच केंद्रात मंत्री असताना शशी थरुर यांनी मदत केली आणि केरळमध्ये कंपनीसाठी जागाही दिली. मात्र आम्ही अपयशी ठरलो.यश-अपयशाच्या चौकटीतून बाहेर निघणे गरजेचेअपयशाने खचलो नाही. प्रयत्न सुरूच ठेवले. आज आम्ही सुरू केलेल्या स्काउट्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने चार कंपन्या आहेत. पार्किंगच्या समस्येच्या जाणिवेमुळे अनेकांना या प्रकल्पाचे महत्त्व कळले आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रकल्पाच्या प्रेझेंटेशनसाठी बोलविले आहे. नागपूर शहरासाठीही हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू असल्याचे मंगेश वानखेडे यांनी सांगितले. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत म्हणून स्काउट्स अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजची स्थापना केली. शेतकऱ्यांचे धान्य दलालाशिवाय सैन्य दलात पोहचेल, याचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच पुण्यात मॅरेथॉन घेणार असून यामध्ये बॉलिवूडचा आघाडीचा नायक सलमान खान व अन्य स्टार्स येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी यश आणि अपयशाच्या चौकटीतून बाहेर निघून मोठा विचार करावा. कारण विचार कराल तरच सत्यात उतरेल, असा कानमंत्र यावेळी मंगेश वानखेडे यांनी दिला.णि एक दिवस मित्रासोबत चांगल्या पगाराची नोकरी सोडली. घरच्यांना मनस्ताप झाला. मात्र ध्येय गाठण्यासाठी हे आवश्यक होते. स्वत:चा उद्योग स्थापन करावा हा एकच विचार मनात होता, मात्र काय करावे हे सुचत नव्हते. अनेक महिने खाली राहिल्याने पैसेही संपले होते. मात्र आता नोकरी करायची नाही हा विचार पक्का होता. भविष्यात गरज पडेल, असे काही करायचे होते. या काळात पैशांची समस्या सोडविण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कामे केली. (प्रतिनिधी)