निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात, गावोगावी मोरपंख विक्रेत्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मागणी असल्याने चक्क मोर जिथे पाणी पितात त्या पाणवठ्यांमध्ये युरिया टाकून मोरांना मारून नंतर पंख काढण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. विदर्भात अशा प्रकाराची नोंद नसली तरी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानसारख्या भागात हा प्रकार सर्रास होत असल्याचे सांगितले जात आहे.राष्ट्रीय पक्षी मोराला धार्मिक महत्त्वही आहे. घरासमोर मोरपंख लावले तर सुखसमृद्धी येते, अशी मान्यता आहे. फॅशन म्हणूनही मागणी आहे. मागणीमुळे विक्रीचे प्रमाण वाढले आहे. नागपूर शहरात ५० पेक्षा अधिक मोरपंख विक्रेते फिरताना दिसतात. सध्या त्यांचा ठिय्या कॉटन मार्केटच्या एका गेस्ट हाऊसमध्ये आहे. त्यांच्याशी सहज चर्चा केली तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आली. या विक्रेत्यांना ६,००० रुपये महिना पगार व राहण्या-खाण्याची व्यवस्था ठिकाणी करून दिली जाते. ही माणसे मग फिरून मोरपंख विकतात. हा एक संघटित गुन्हा आहे. मात्र कायद्यातील सवलतीमुळे वन विभाग व पोलीस यंत्रणाद्वारे दुर्लक्ष केले जाते.आग्रा हे केंद्रपर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, झारखंड या भागात मोरांची संख्या सर्वाधिक आहे. भारतात मोरपंख विक्रीवर बंदी नाही. उन्हाळ्यात जंगलाबाहेरच्या पाणवठ्यात युरिया टाकला जातो. मृत मोरांचे पंख व अवयव काढून आणले जातात. आग्रा हे मोरपंख व आभूषण विक्रीचे मोठे केंद्र आहे. त्यानंतर व्यापारी पगारी माणसे ठेवून देशभर विक्रीसाठी पाठवितात.विक्रेत्यांची नोंद ठेवणे आवश्यकमानद वन्यजीव रक्षक प्रफुल्ल भांबोरकर यांच्या मते, राज्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात मोरपंख विक्रीला येणा?्यांचा कुठलाही रेकॉर्ड नसतो. त्यामुळे हा प्रकार सर्रास सुरू आहे. किमान सीमेवर आधारकार्डसह या विक्रेत्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. शिवाय वन विभागाकडून मोरपंखांचे स्रोत कुठे आहेत, याचा तपास करणे गरजेचे आहे.
अमानुष; मोरपंखांसाठी पाण्यात युरिया टाकून केली जाते मोरांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 10:45 AM
Nagpur News शहरात, गावोगावी मोरपंख विक्रेत्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मागणी असल्याने चक्क मोर जिथे पाणी पितात त्या पाणवठ्यांमध्ये युरिया टाकून मोरांना मारून नंतर पंख काढण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
ठळक मुद्देविक्रेत्यांची संख्या अचानक वाढलीआग्रा, राजस्थानपर्यंत पसरलेत धागे