शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

‘एसडीआरएफ’च्या निधी वितरणात विदर्भावर अन्याय; नागपूर, अमरावतीच्या वाट्याला १८ टक्केच निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 7:00 AM

Nagpur News राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्य शासनाने कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी सर्व जिल्ह्यांना निधीचे वितरण केले. विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाट्याला अवघा १८ टक्के निधी आला आहे.

ठळक मुद्दे रुग्ण कमी असतानादेखील औरंगाबादवर राज्य शासनाची मेहेरबानी

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्य शासनाने कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी सर्व जिल्ह्यांना निधीचे वितरण केले. दोन्ही लाटांमध्ये महाराष्ट्र पोळून निघाला असताना मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ३९ टक्केच निधीचे वितरण केले. आश्चर्याची बाब म्हणजे निधी वितरणातदेखील दुजाभाव करण्यात आला असून, विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाट्याला अवघा १८ टक्के निधी आला आहे. दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरीत करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. (Injustice in Vidarbha in distribution of SDRF funds; Nagpur, Amravati share only 18%)

 

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे विचारणा केली होती. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची एकूण रक्कम ३,४३६ कोटी ८० लाख इतकी असून, यात केंद्राचा हिस्सा ७५ टक्के इतका आहे. कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी शासनाने मार्च २०२०मध्ये ३५ टक्के व सप्टेंबर २०२०मध्ये ५० टक्के खर्चाची मर्यादा निश्चित केली. सप्टेंबरनंतर ५० टक्के निधीचे वितरण व्हायला हवे होते. प्रत्यक्षात मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत १ हजार ३६६ कोटी ६८ लाख ४३ हजार इतक्याच निधीचे वितरण करण्यात आले.

नागपूर व अमरावती विभाग मिळून ११ लाखांहून अधिक रुग्ण सापडले व २० हजारांहून अधिक मृत्यू झाले. परंतु प्रत्यक्षात २५१ कोटी १९ लाख ४४ हजारांचीच रक्कम वितरीत करण्यात आली. दुसरीकडे औरंगाबाद विभागात ६ लाख ३५ हजार ८४६ रुग्ण आढळले व १६ हजार ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु तरीदेखील विभागाला विदर्भाहून जास्त अनुदान मिळाले. औरंगाबादला मिळालेल्या निधीचा आकडा ३१२ कोटी ८८ लाख ९८ हजार इतका होता. नाशिकमध्येदेखील साडेनऊ लाखांहून अधिक रुग्ण असताना १५५ कोटींचीच रक्कम मिळाली. शासनाने कशाच्या आधारावर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे वितरण केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

सर्वाधिक निधी पुणे विभागाला

कोरोनाची सर्वात जास्त दाहकता पुणे विभागात होती. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार तेथे जवळपास २० लाख रुग्ण आढळले व ४२ हजारांहून अधिक मृत्यू झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत विभागाला ३४८ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले, तर कोकण विभागाला ३२४ कोटी ६१ लाख प्राप्त झाले.

विभाग - एसडीआरएफअंतर्गत मिळालेला निधी - एकूण रुग्ण - मृत्यू

नागपूर - १७६ कोटी ९९ लाख २८ हजार - ७,७०,३६० - १४,२६१

अमरावती - ७४ कोटी २० लाख १६ हजार - ३,५७,७०३ - ६,२३१

औरंगाबाद - ३१२ कोटी ८८ लाख ९८ हजार - ६,३५,८४६ - १६,९०६

नाशिक - १३१ कोटी ५१ लाख ८४ हजार - ९,५२,४०१ - १९,५८५

पुणे - ३४६ कोटी ४६ लाख ३६ हजार - १९,९५,९९०- ४२,२२०

कोकण - ३२४ कोटी ६१ लाख ८१ हजार - १७,८८,९७३ - ३८,८५५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या