लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. त्यांनी सांगितले की, ते या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विनंती करून ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचवतील.भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी यासंदर्भातील उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. देशमुख यांनी नाणारमध्ये कोस्टल रिफायनरीला होत असलेला विरोध पाहता ही रिफायनरी विदर्भात स्थापित करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, ‘त्यांना माहीत आहे नाणारमध्ये प्रस्तावित रिफायनरी ही कोस्टल (समुद्र तट) आहे, आणि समुद्राला विदर्भात आणता येऊ शकत नाही. परंतु रिफयनरी मात्र निश्चित स्थापित होऊ शकते. यामुळे ५० हजार लोकांना प्रत्यक्ष व १ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. देशाला ‘आॅईल सिक्युरिटी’ देण्यासाठी या दिशेने ही महत्त्वपूर्ण ठरेल. देशात नऊ इनलॅण्ड रिफायनरी आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नाणारची कोस्टल रिफायनरी विदर्भात आणता येऊ शकत नाही. मात्र इनलॅण्ड रिफायनरीसाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी नाणारमध्ये रिफायनरी येणार की नाही, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी विदर्भात रिफायनरी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत नाणारबाबतचे उत्तर देण्याचे टाळले.देवेंद्र, धर्मेंद्र आणि नरेंद्रसभागृहात त्यावेळी सर्वांनाच हसू आले जेव्हा आशिष देशमुख यांनी ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावी’ अशी विनंती मुखयमंत्र्यांना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत म्हटले की ‘ मी (देवेंद्र) रिफायनरी स्थापित करण्याची विनंती धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवेल.
विदर्भात होणार ‘इनलॅण्ड रिफायनरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 7:54 PM
नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. त्यांनी सांगितले की, ते या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विनंती करून ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचवतील.
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पेट्रोलियम मंत्र्यांना करणार विनंती