शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

एसीबीकडून ४०० सिंचन प्रकल्पांची चौकशी

By admin | Published: February 20, 2016 3:18 AM

उच्च न्यायालयाच्या १२ डिसेंबर २०१४ च्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ४०० सिंचन प्रकल्पांची खुली चौकशी केली जात आहे.

हायकोर्टात राज्य सरकारची माहितीनागपूर : उच्च न्यायालयाच्या १२ डिसेंबर २०१४ च्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ४०० सिंचन प्रकल्पांची खुली चौकशी केली जात आहे. ही माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठापुढे देण्यात आली. सविस्तर माहितीसंदर्भात राज्य सरकारला शपथपत्र दाखल करता यावे, यासाठी या जनहित याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब करण्यात आली आहे.विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला. ३८ सिंचन प्रकल्पांची कामे सुरू असून यात धरणे, कालवे आणि उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. त्यापैकी एकही प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकल्पांचा खर्च अनेक पटींनी वाढला. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च होत असताना काहीही केल्या प्रकल्प पूर्ण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत असून राजकीय पुढारी, कंत्राटदार आणि नोकरशहा यांनी मलिदा वाटून घेतला, हा घोटाळा ७० हजार कोटी रुपयांचा असून चौकशीची मागणी जनहित याचिकेद्वारे जनमंचने केली होती. त्यावर एसीबीच्या पोलीस संचालकांमार्फत सिंचन घोटाळ्याचा खुला तपास करण्यात येईल, माजी मंत्री अजित पवार, छगन भुजबळ, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१४ रोजी ही जनहित याचिका निकाली काढली होती. प्रत्यक्षात एसीबीकडून या प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरू आहे. एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जनमंचचे सल्लागार शरद पाटील यांनी नव्याने जनहित याचिका दाखल केली. सिंचन घोटाळ्याचा तपास संथ गतीने सुरू राहिल्यास दोषींविरुद्धचा तपास तो मरेपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. तपास जलदगतीने व्हावा, यासाठी तो सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली. याचिकाकर्त्याची बाजू ऐकून न्यायालयाने राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. गुन्हा दाखल करण्यात न आल्याने गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसीबीचे पोलीस महासंचालक, विदर्भ सिंचन विकास महामंडळ आणि नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांना उच्च न्यायालयाने नोटीस जारी करून दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)‘त्या’ प्रकल्पांचा खर्च वाढलाया याचिकेतील ठळक मुद्दे असे की, २००९ मध्ये सात महिन्यात विदर्भ सिंचन महामंडळांतर्गत सुरू असलेल्या ३८ सिंचन प्रकल्पांचा अवाढव्य खर्च वाढवून तो ६ हजार ६७२ कोटीवरून २६ हजार ७२२ कोटी करण्यात आला. ३८ पैकी ३० प्रकल्पांना मोठ्या घाईने मंजुरी देण्यात आली. १४ आॅगस्ट २००९ रोजी ११, २४ जून २००९ रोजी १०, ७ जुलै २००९ रोजी ५, १८ आॅगस्ट २००९ रोजी ४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ६ प्रकल्पांचा खर्च ६ पटहून ३३ पट वाढविण्यात आला. विदर्भ सिंचन विकास महामंडळाने मात्र २००९ मध्ये सात महिन्यात हा खर्च १७ हजार ७०१ कोटी रुपये झाल्याचा दावा शपथपत्र दाखल करून केला. न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी काम पाहिले.