लोकमतच्या वृत्ताची दखल : वरिष्ठांशी चर्चा नागपूर : लोकमतने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या ‘कारागृह नव्हे नंदनवन : एन्जॉयमेंटफूल लाईफ‘ या वृत्ताने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली . मुख्यमंत्री कार्यालय, गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तसेच पोलीस महासंचालनालयातील वरिष्ठांनी लोकमतच्या वृत्ताचा हवाला देत स्थानिक अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्याची माहिती आहे. त्याचमुळे प्रशासनाला सुटी असली तर अनेक वरिष्ठ अधिकारी खास करून पोलीस विभागात याच वृत्ताच्या अनुषंगाने घडामोडी झाल्या. भ्रष्ट अधिकारी खतरनाक कैद्यांना कारागृहात कशा सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यामुळे कारागृहातही कैदी कसे मजेत आहेत, त्याची व्हीडीओ क्लीप लोकमतच्या हाती लागली. त्याआधारे आज लोकमतने ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताच्या आधारे आज सकाळपासूनच विविध वृत्त वाहिन्यांनी कारागृहातील अनागोंदीवर प्रकाश टाकणारे वृत्त प्रसारित केले. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय, गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तसेच पोलीस महासंचालनालयातील वरिष्ठांनी लोकमतच्या वृत्ताचा हवाला देत स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने संबंधित माहिती मागवून घेतल्याचे समजते. त्यामुळे सुटीचा दिवस असूनही अनेक वरिष्ठ अधिकारी खास करून पोलीस विभागात याच वृत्ताच्या अनुषंगाने घडामोडी सुरू होत्या. सर्वत्र लोकमतच्याच वृत्ताची चर्चा होती.भ्रष्टाचाऱ्यांची यादी तयारअतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनीही आज दिवसभर कारागृहात पुन्हा कसून तपासणी आणि चौकशी केली. बाहेरून आलेल्या पथकांनीही केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. कैदी पलायन प्रकरणाला अधिकाऱ्यांची साथ असल्याचा निष्कर्ष आज अधिकच बळकट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अनेक भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी बोरवणकर यांनी तयार केली असून, मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर कोणत्याही क्षणी या भष्टाचाऱ्यांवर कारवाई (निलंबन, बडतर्फीची घोषणा) होऊ शकते. (प्रतिनिधी)पुन्हा एक पाप उजेडातदरम्यान, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनीही कारागृहातील अनेकांची बयानं नोंदविली. कारागृहात गहजब निर्माण झाला असताना शुक्रवारी दुपारी पुन्हा एक पाप उजेडात आले. तपासणीदरम्यान पोलिसांना बरॅक क्रमांक १ आणि स्वयंपाकगृहाच्या मधल्या भागात मोबाईल सापडला. पोलिसांनी तो जप्त केला. या प्रकरणाची नोंद धंतोली पोलीस ठाण्यात करण्यात आली.
सीएम, डीजी कार्यालयातून चौकशी
By admin | Published: April 04, 2015 2:30 AM