शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

सह पोलीस आयुक्तांकडून न्यायालय सुरक्षेची पाहणी

By admin | Published: February 28, 2015 2:24 AM

जिल्हा न्यायालय आवारातील ‘ओल्ड ट्रेझरी बार रूम’समोर गुरुवारी घडलेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत शुक्रवारी सह पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी...

नागपूर : जिल्हा न्यायालय आवारातील ‘ओल्ड ट्रेझरी बार रूम’समोर गुरुवारी घडलेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत शुक्रवारी सह पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांनी न्यायालय सुरक्षा संदर्भात उपाययोजना करण्यासाठी पाहणी केली. पाहणीच्या वेळी सह पोलीस आयुक्तांसोबत उपायुक्त संजय लाटकर, सदरचे पोलीस निरीक्षक रफिक बागवान, न्यायालय सुरक्षा पोलीस चौकीचे प्रमुख उपनिरीक्षक विजयकुमार वाकसे उपस्थित होते. पाहणीनंतर येथील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. काल मोहम्मद साबीर अली आणि हनी गोविंदप्रसाद तिवारी हे आपापल्या साथीदारांसह प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयातील कॉटन मार्केट खुनी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी आले होते. हनी हा या खटल्यात आरोपी आणि साबीर अली हा फिर्यादी साक्षीदार म्हणून आला होता. सुनावणीला वेळ असल्याने ते न्यायालयाच्या बाहेर थांबले होते. ओल्ड ट्रेझरी इमारतीतील माधवी एन्टरप्रायजेससमोर अचानक अली आणि त्याच्या साथीदारांनी अक्षय किशोर तिवारी आणि हनी तिवारी यांच्यावर वस्तऱ्याने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. आज या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक राखुंडे यांनी मोहम्मद साबीर अली रा. कामगारनगर टेका नाका याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. पारवानी यांच्या न्यायालयात हजर केले. हल्ल्यात सहभागी आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन अटक करणे आहे, आरोपींकडे आणखी शस्त्रे होती काय, याबाबत तपास करून शस्त्रे जप्त करणे आहे, आदी बाबी सरकार पक्षाने न्यायालयाला सांगून पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. (प्रतिनिधी)