लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी गुढीपाडव्याचे औचित्य साधून मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) मनीष अग्रवाल यांनी मध्य प्रदेशातील विविध स्थानकांना भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली. कामाचा दर्जा तपासून संबंधितांना आवश्यक त्या सूचना, निर्देश दिले.
आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून डीआरएम अग्रवाल यांनी वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक अमन मित्तल तसेच वरिष्ठ विभागीय अभियंता (उत्तर विभाग) सचिन गणेर तसेच अन्य सहकाऱ्यांना घेऊन मध्य प्रदेशमधील पांढूर्णा, मुलताई तसेच बैतूल स्थानकांचा दाैरा केला. येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची तसेच गुडस् शेडची पाहणी केली. या स्थानकांवर प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा कशा आहेत, त्याची पाहणी केली. विकास कामांचा दर्जा तपासून संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. या तीनही रेल्वे स्थानकांचे आत आणि बाहेरचे सुशोभिकरण कशा पद्धतीने होणार आहे, त्याचीही माहिती घेतली.