शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

'इन्स्टा’वरून देतात ड्रग्जच्या ऑर्डर्स, कुरिअरने डिलिव्हरीही, नायजेरियन तस्कर जाणूनबुजून करवून घेतात अटक'

By योगेश पांडे | Published: December 13, 2023 5:57 AM

नायजेरियन तस्कर जाणूनबुजून करवून घेतात अटक

योगेश पांडे

नागपूर : विधान परिषदेत मंगळवारी अमली पदार्थांच्या तस्करीचा विषय चांगलाच गाजला व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत धक्कादायक खुलासेदेखील केले. ही तस्करी म्हणजे एकप्रकारे देशावरील हल्लाच आहे. एक मोठे सिंडिकेट यामागे काम करते व अनेकदा तर ‘डार्क नेट’ व ‘इन्स्टाग्राम’सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून हे रॅकेट चालते. तेथूनच ऑर्डर घेतल्या जातात व थेट कुरिअरने डिलिव्हरी होते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान या मुद्द्यावर फडणवीस यांनी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत सखोल माहिती दिली. कुरिअरमधून अमली पदार्थांची डिलिव्हरी होत असल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर आता कुरिअर कंपन्यांना विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पोलिस विभागाकडूनही अकस्मात तपासणी करण्यात येत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नायजेरियन कैद्यांसाठी डिटेंशन सेंटर

अमली पदार्थांच्या तस्करीत नायजेरियन नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. मागील काही काळात राज्यात १७४ जणांना पकडण्यात आले. मात्र, नायजेरियातील या लोकांना ही कारवाई किंवा तात्पुरती अटक हवीच असते. एकदा गुन्हा दाखल झाला की नियमांनुसार त्यांना खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या देशात थेट ‘डिपोर्ट’ करता येत नाही. याचा फायदा ते लोक उचलतात व रॅकेट सुरू ठेवतात. त्यामुळे आता या लोकांना कारवाई झाल्यावर डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबईत एक केंद्र उभारण्यात आले आहे व इतरही केंद्रे उभारण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

हुक्का पार्लर्स बंद करा

हुक्का पार्लर्सच्या माध्यमातून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला. ही पार्लर्स अमली पदार्थांच्या डिलिव्हरीची केंद्र बनलेली आहेत व ती बंद करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली. मुंबईतून शाळा-महाविद्यालयांच्या जवळ असलेल्या २,२६९ पानटपऱ्या तोडण्यात आल्या व ३८,८७३ ई-सिगारेट्स जप्त करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

‘ड्रग्ज पेडलर’ आणि...

महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या रॅकेटवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशांनंतर देशातील विविध राज्यांत ॲन्टी-नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन झाल्या आहेत. विविध राज्यांकडून गुप्त माहिती एकमेकांना शेअर करण्यात येत आहे व त्यामुळे कारवाया वाढल्या आहेत. महाराष्ट्रात पोलिसांना एखाद्या ‘ड्रग्ज पेडलर’ला पकडल्यानंतर त्याच्या विविध लिंक शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस