लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदान केंद्रांवरील गर्दी कमी करा, त्याचे नियोजन करा. एवढेच नव्हे तर ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मशीन बिघडल्याचे लक्षात येताच ती तातडीने बदला अशा सूचना मतदान केंद्र अधिकाऱ्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळत होत्या. कारण निवडणूक प्रक्रियेवर लाईव्ह नजर ठेवण्याची व्यवस्था पहिल्यांदाच करण्यात आली होती. एकूण ४४० मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा कंट्रोल जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथून केला जात होता. परिणामी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी तब्बल ४४० मतदान केंद्रामध्ये थेट लाईव्ह वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ८२ संवेदनशील मतदान केंद्रांचाही समावेश आहे. जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघाचा यात समावेश आहे. प्रथमच अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. या ४४० मतदान केंद्रातील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कंट्रोल रूम होती. येथे १२ विधानसभेसाठी १२ मोठे टीव्ही लावण्यात आले होते. येथून ४४० मतदान केंद्रांवर काय सुरू आहे, हे लाईव्ह पाहता येत होते. तसेच काही गडबड आढळून आल्यास, गर्दी वाढली असेल, ईव्हीएम खराब झाले असेल तर त्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले जात होते. कामठी विधानसभा क्षेत्रातील पांजरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळा असलेल्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट खराब झाले. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लक्षात येण्याआधीच बेव कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवून असलेल्या कर्मचाºयांना दिसले. तात्काळ त्यांना नवी व्हीव्हीपॅट लावण्याच्या सूचना दिल्या. सायंकाळी ४ च्या नंतर अनेक मतदान केंद्रावर गर्दी असल्याचे दिसून आले. येथील सुरक्षा यंत्रणेला सूचना करून मतदारांना केंद्राबाहेर करून गर्दी कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी वॉर रूमची पाहणी करून माहिती घेतली. महाआयटीचे जिल्हा नियंत्रण उमेश घुघुसकर, एनआयसीच्या समन्वयक शमा बारोटे, संजीव कोहळे, नीलेश खमासे यांनी यशस्वी वेब कास्टिंगसाठी विशेष प्रयत्न घेतले.अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष नजरया लाईव्ह वेब कास्टिंगची व्यवस्था करण्याचा मुख्य उद्देश संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट नजर ठेवणे हा होता. यासोबत इतर मतदान केंद्रांवरही नजर ठेवण्यात आली. संवेदनशील मतदान केंद्रात काही गडबड झालीच तर तातडीने उपाययोजना करता येतील. असामाजिक तत्त्वांच्या मंडळींना तातडीने पकडता येईल, यासाठी ही व्यवस्था होती. परंतु तशी कुठलीही वेळ आली नाही.मुख्य निवडणूक आयोग ते जिल्हाधिकाऱ्यांचे थेट लक्षया वेब कास्टिंगच्या माध्यमातून सर्व ४४० मतदान केंद्रांवरील थेट प्रक्षेपण भारत मुख्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे थेट लक्ष होते. यासाठी ३५ लोकांची टीम नजर ठेवून होते, तर ४६० कर्मचारी प्रत्यक्ष केंद्रावर कार्यरत होते. यासाठी खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २५ आयटी प्राध्यापकांची मदत घेण्यात आली.
बचत भवनातून केंद्राध्यक्षांना सूचना : मतदान प्रक्रियेवर होती लाईव्ह नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:18 PM
मतदान केंद्रांवरील गर्दी कमी करा, त्याचे नियोजन करा. एवढेच नव्हे तर ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मशीन बिघडल्याचे लक्षात येताच ती तातडीने बदला अशा सूचना मतदान केंद्र अधिकाऱ्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळत होत्या. कारण निवडणूक प्रक्रियेवर लाईव्ह नजर ठेवण्याची व्यवस्था पहिल्यांदाच करण्यात आली होती. एकूण ४४० मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा कंट्रोल जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथून केला जात होता. परिणामी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
ठळक मुद्दे‘गर्दी कमी करा, ईव्हीएम तातडीने बदला’