शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

‘मिटिगेशन मेजर्स’वरील सूचना फेटाळल्या

By admin | Published: April 01, 2016 3:24 AM

सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासा रोडवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी

हायकोर्ट : सृष्टी पर्यावरण व कन्झर्व्हेशन ट्रस्टला दणकानागपूर : सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासा रोडवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या ‘मिटिगेशन मेजर्स’संदर्भात सृष्टी पर्यावरण मंडळ व कन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट या अशासकीय संस्थांनी केलेल्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावल्या. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (डब्ल्यूआयआय) व नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन आॅथोरिटी (एनटीसीए) या आपापल्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्थांच्या तज्ज्ञांनी सखोल अभ्यास व आंतरराष्ट्रीय अहवाल पडताळून ‘मिटिगेशन मेजर्स’ दिले असून त्यात हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.या रोडवर ‘मिटिगेशन मेजर्स’ अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या ‘अंडरपासेस’ची उंची पाच मिटरवरून सात मिटर करण्यात यावी व ‘अंडरपासेस’ची जागा ‘गुगल मॅप’नुसार निश्चित करण्यात यावी अशा सूचना सृष्टी पर्यावरण मंडळाने केल्या होत्या तर, कन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्टने २०१२ मध्ये निश्चित ‘मिटिगेशन मेजर्स’ लागू करण्यास सांगितले होते. न्यायालयाने या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या घडामोडींच्या उल्लेखासह विस्तृत आदेश जारी करून दोन्ही संस्थांच्या सूचना फेटाळून लावल्या. ‘डब्ल्यूआयआय’ व ‘एनटीसीए’ यांनी या रोडवर ७५०, ३००, १००, ८०, ६५, ६० व ५० मिटरचे ‘अंडरपासेस’ बांधण्याचा अहवाल दिला आहे. यासह अन्य ‘मिटिगेशन मेजर्स’च्या बांधकामावर न्यायालयाची नजर राहणार आहे. मुख्य वनसंवर्धक नागपूर यांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह ‘मिटिगेशन मेजर्स’च्या बांधकामावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, यासंदर्भात दर आठ आठवड्यांत प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या रोडच्या दुरवस्थेची न्यायालयाने स्वत:च दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालय मित्र असून मध्यस्थ माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्यातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अनीश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)