शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भरतवनच्या संरक्षणासाठी एकवटल्या संघटना : बुधवारी मानव शृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:11 PM

फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देवनराईने दर्शविला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणांतर्गत प्रस्तावित भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गासाठी शेकडो वृक्षांच्या तोडीविरोधात ५० च्यावर संघटना एकवटल्या आहेत. याअंतर्गत बुधवारी सकाळी भरतवन व फुटाळा तलाव परिसरात मानव शृंखला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वनराईनेही पाठिंबा दर्शविला असून पर्यावरणाच्या प्रश्नावर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि म्युझिकल फाऊंटेन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अ‍ॅप्रोच म्हणून भरतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन रोड तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रस्तावित मार्ग भरतवन या वनपरिसरातून होत जाणार आहे. त्यासाठी वनपरिसरातील शेकडो झाडांची कटाई केली जाणार असून अशी झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी या प्रस्तावाबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, चिन्हांकित करण्यात आलेली १५० च्यावर वृक्ष १०० ते १५० वर्षे जुने आहेत. या पुरातन झाडांसह लहानमोठी १५०० च्या जवळपास वृक्षांना मार्गासाठी तोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणाची मोठी हानी करणारा आहे. भरतवनच्या अधिवासात जवळपास १२० प्रजातींचे पक्षी आणि २२ मोरांचे वास्तव्य आहे. प्रस्तावाच्या एका निर्णयाने जैवविविधतेला हानी पोहचणार असल्याचे ते म्हणाले. तलावाचा प्रश्न विचारात घेतल्यास सौंदर्यीकरणाऐवजी तलावाची खोली वाढविणे, तलाव स्वच्छ करणे, बंद पडलेले पाण्याचे स्रोत जिवंत करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण विकासाच्या नावावर पर्यावरणाची हानी पोहचविणारा प्रकल्प भविष्यात संकट निर्माण करणारा आहे. सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यापेक्षा पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून असा दुराग्रही प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडावा, असे मत त्यांनी मांडले. १ मे रोजी सकाळी ७ वाजता होणाऱ्या मानव शृंखला आंदोलनात लोकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेत वनराईचे अजय पाटील, ज्येष्ठ सदस्य बाबा देशपांडे, सचिव नीलेश खांडेकर उपस्थित होते.नव्या रस्त्याची गरज काय?यावेळी माहिती देताना वनराईचे सचिव नीलेश खांडेकर यांनी सांगितले की, तलावाला लागून एक मोठा रस्ता आहे. रविनगर चौक, सिव्हील लाईन्स व सेमिनरी हिल्सकडूनही रस्ता आहे. वनराईच्या सदस्यांनी सतत २१ दिवस या मार्गांवरील वाहतुकीचे निरीक्षण केले. कुठल्याही रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होताना आढळला नाही. शहरात आधीच सिमेंटचे जंगल पसरले आहे. जे काही वृक्ष व वनपरिसर राहिला आहे, तो टिकविणे आवश्यक आहे. असे असताना शेकडो वृक्षांची कत्तल करून नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर