लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराजवळ फिरत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून लुटारू पळून गेलेल्या एका आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्याला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले.अंबाझरीतील शिवाजीनगरात राहणाऱ्या रघुनंदिनी सुंदरम रंजन (वय ६२) या निवृत्त बँक कर्मचारी होत. रविवारी त्या सायंकाळी त्यांच्या घराच्या बाजूच्या परिसरात फिरत होत्या. शिवाजीनगर गार्डनसमोर अचानक दुचाकीवरून आलेल्या एका आरोपीने रंजन यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. रंजन यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, दुसºयांना ही घटना कळेपर्यंत आरोपी पळून गेला होता. रंजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. ती माहिती झाल्यानंतर अंबाझरी पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचे पथकही आरोपीचा शोध घेत होते. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा छडा लावून त्याला वाडी, खडगावमधील त्याच्या भाड्याच्या खोलीत पकडले. भारत गुरदासमल वासवानी (वय ३४) असे त्याचे नाव आहे. तो सिंधू कॉलनी, फ्रेजरपुरा शदानी दरबार जवळ, अमरावती येथील रहिवासी आहे.राज्यात अनेक जिल्ह्यात हैदोसआरोपी वासवानी याने राज्यातील अनेक ठिकाणी हैदोस घातला असून, नागपूर, अमरावती, अकोला, जळगावसह ठिकठिकाणी त्याने चेनस्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर एकूण २१ गुन्हे दाखल असून, त्याला यापूर्वीही अनेकदा अटक झालेली आहे.अंबाझरीचा गुन्हा घडल्याबरोबर त्याला अटक करण्याची कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
नागपुरात आंतरराज्यीय चेनस्नॅचर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 1:29 AM
घराजवळ फिरत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून लुटारू पळून गेलेल्या एका आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्याला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले.
ठळक मुद्देअंबाझरीतील चेनस्नॅचिंग : २४ तासात आरोपीला पकडले