लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डोंगरगड यात्रेसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात इतवारी रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या शिवनाथ आणि इंटरसिटी एक्स्प्रेसला अतिरिक्त जनरल कोच लावण्याचा निर्णय घेतला असून इतर एक्स्प्रेस गाड्यांनाही डोंगरगड येथे थांबा देण्यात आला आहे.डोंगरगड यात्रेसाठी दरवर्षी नागपूरसह विदर्भातून हजारो भाविक जातात. त्यामुळे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने इतवारी रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या १८२३९ बिलासपूर-इतवारी शिवनाथ एक्स्प्रेसमध्ये ६ ते १४ एप्रिलदरम्यान आणि १८२४० इतवारी-बिलासपूर शिवनाथ एक्स्प्रेस तसेच १२८५६/१२८५५ इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये ७ ते १५ एप्रिल दरम्यान एक अतिरिक्त जनरल कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय १२८१२/१२८११ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया, २०८१३/२०८१४ पुरी-जोधपूर-पुरी, १२९०६/१२९०५ हावडा-पोरबंदर-हावडा आणि १२८५१/१२८५२ बिलासपूर-चेन्नई-बिलासपूरला ६ ते १४ एप्रिल दरम्यान दोन मिनिटांसाठी डोंगरगड येथे थांबा देण्यात आला आहे. रेल्वेगाडी क्रमांक ५८२०८ भवानी पटना-रायपूर आणि ५८२०४ रायपूर-गेवरा रोड या गाड्यांचा डोंगरगडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. याशिवाय ६८७४१/६८७४२ दुर्ग-गोंदिया-दुर्ग ही गाडी रायपूरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशांना सुविधा व्हावी यासाठी डोंगरगड रेल्वेस्थानकावर सहाय्यता केंद्र, अतिरिक्त चौकशी केंद्र, अनारक्षित तिकीट खिडकी, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना सतत गाड्यांची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
डोंगरगड यात्रेसाठी इंटरसिटी, शिवनाथला अतिरिक्त कोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 4:00 AM
डोंगरगड यात्रेसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात इतवारी रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या शिवनाथ आणि इंटरसिटी एक्स्प्रेसला अतिरिक्त जनरल कोच लावण्याचा निर्णय घेतला असून इतर एक्स्प्रेस गाड्यांनाही डोंगरगड येथे थांबा देण्यात आला आहे.
ठळक मुद्देदपूम रेल्वे प्रशासनाचा निर्णय : एक्स्प्रेस गाड्यांनाही दिला थांबा