चीनच्या व्यापारिक प्रतिनिधींची मिहानला भेट : गुंतवणुकीवर चर्चानागपूर : चीनच्या व्यापारिक प्रतिनिधींनी बुधवारी मिहान-सेझ प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पातील अद्ययावत सुविधा आणि मुख्य भागांची पाहणी केली. चीनमधील अनेक कंपन्या भारतात मुख्यत्वे मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याची ग्वाही प्रतिनिधींनी यावेळी दिली.प्रतिनिधींनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) अधिकाऱ्यांशी प्रकल्पात गुंतवणुकीवर चर्चा केली. प्रतिनिधींमध्ये चेन युहोंग, ली जिआलीन, वांग जीन, ली जिआझीन आणि चीनमधील विविध कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. रुद्रा लिव्हिंगचे निखील तायल आणि सुषमा अग्रवाल यांनी भेट घडवून आणली. प्रतिनिधींनी मिहान प्रकल्पातील प्रमुख भागांची पाहणी केली. एमएडीसीचे सल्लागार (तांत्रिक) एस.व्ही. चहांदे आणि मुख्य अभियंते एस.के. चॅटर्जी यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी एमएडीसीचे विपणन व्यवस्थापक अतुल ठाकरे आणि जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी हजर होते. मिहान प्रकल्पात आधुनिक पायाभूत सुविधा असून बरेच उद्योजक गुुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. निवासी, व्यावसायिक, गुणवत्तेचे फर्निचर, एलईडी लाईट व अंतर्गत सजावटीची उत्पादने या उत्पादनांवर मुख्य फोकस आहे. अतुल ठाकरे यांनी पॉवर पार्इंट सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची इत्थंभूत माहिती दिली. चीनमधील कंपन्या प्रकल्पात गुंतवणुकीस इच्छुक असल्यास त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले.(प्रतिनिधी)
चीन मिहानमध्ये गुंतवणुकीस इच्छुक
By admin | Published: September 03, 2015 2:33 AM