शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
3
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
4
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
5
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
6
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
7
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
8
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
9
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
10
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
11
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
12
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
15
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
16
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
17
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
18
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
19
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
20
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य

नागपुरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 7:53 PM

देश-विदेशातून दोन हजारावर प्रतिनिधी येणार : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर येत्या ३ ऑक्टोबर रोजी नागपुरात सुरेश भट सभागृहात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत देश -विदेशातून दोन हजारावर प्रतिनिधी सहभागी होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. गगन मलीक फाऊंडेशनचे अध्यक्ष गगन मलीक आणि माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी शनिवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

थायलंडच्या चेरनत्वन आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटरचे प्रमुख भदंत फ्रा मेधीमज्जीरोदम यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. थायलंडचे डॉ. पाेंगसांक टंगकाना हे बीजभाषण करतील. या परिषदेत वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्टचे अध्यक्ष भदंत पोर्नचाईपीन्यापोंगे, भदंत महा आर्यन, मास्टर मिचेल ली (जर्मनी), कॅप्टन नट्टाकिट, टिथीरड हेंगसाकुल,पटचारपीमोल, उषा खोराना, उट्टीचाई वाेरासिंग, मिथीला चौधरी (थायलंड), डॉ. थीम क्वांग (जर्मनी)यांच्यासह डॉ. सुखदेव थाेरात, भंते विमलकिर्ती गुणसिरी, डॉ. यशवंत मनोहर, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. रुपाताई बोधी, डॉ. विमल थोरात आदी मार्गदर्शन करतील. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेयरमन माजी खासदार विजय दर्डा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एड. सुलेखा कुंभारे, सिद्धार्थ हत्तीमारे यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. पत्रपरिषदेला नितीन गजभिये, प्रा. वंदना इंगळे, प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. नीरज बोधी, प्रकाश कुंभे आदी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस