शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र नवी दिशा देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:02 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बौद्ध अध्ययन केंद्राच्या निर्मितीतून भारतीय समाजासमोर एक नवा ध्येयादर्श ठेवला आहे. संपूर्ण जग शांती व सुखाच्या शोधात असताना शांती व सुखाच्या निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र नवी दिशा देणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील जगप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरु भदंत अनिल शाक्य यांनी केले.

ठळक मुद्देभदंत अनिल शाक्य : आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बौद्ध अध्ययन केंद्राच्या निर्मितीतून भारतीय समाजासमोर एक नवा ध्येयादर्श ठेवला आहे. संपूर्ण जग शांती व सुखाच्या शोधात असताना शांती व सुखाच्या निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र नवी दिशा देणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील जगप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरु भदंत अनिल शाक्य यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्यावतीने बौद्ध अध्ययन केंद्राच्या नवनिर्मित वास्तुत आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या समारोपीय सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव व परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. पुरणचंद्र मेश्राम होते. व्यासपीठावर आयोजन समितीचे डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. नीरज बोधी, डॉ. विकास जांभुळकर उपस्थित होते. भदंत अनिल शाक्य म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्म स्वीकाराने पवित्र झालेल्या नागपूर शहरात आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या या परिषदेच्या रुपाने नवे शांततामय व परस्पर सौहार्दाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. नाग या शब्दाचा अर्थ उत्कृष्ट असा होत असून नागपूर शहराने या परिषदेच्या माध्यमातून उत्कृष्टतेचा परिचय दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. परिषदेचे मुख्य संयोजक, कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांनी बौद्ध अध्ययन केंद्राशी देश-विदेशातील विद्यापीठातील बौद्ध अध्ययन केंद्रे व डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग जोडल्या जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्ध विचाराचे व आंबेडकर विचाराचे अध्ययन व संशोधन केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन दिवसीय परिषदेतील सत्रात घडलेल्या चर्चेचा वृत्तांत डॉ. कृष्णा कांबळे यांनी मांडला. संचालन डॉ. केशव वाळके यांनी केले. आभार डॉ. विकास जांभुळकर यांनी मानले. परिषदेच्या समारोपापूर्वी आयोजित सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. यशदत्त अलोणे, डॉ. मालती साखरे, डॉ. सी. डी. नाईक यांनी भूषविले. विविध सत्रात मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. कृष्णा आनंद, डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत डॉ. ज्ञानादित्य शाक्य, डॉ. तलत परवीन, डॉ. मृदुल निळे, डॉ. हरीश वानखेडे यांनी आपले विचार मांडले. परिषदेला चीन, म्यानमार, थायलंड, जर्मनी येथील अभ्यासक, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विचारवंत, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर