काटाेल : स्थानिक नबीरा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आणि असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व ३० जून राेजी आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले.
परिषदेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. राजू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सचे अध्यक्ष, प्रा. ब्रिजेश पारे उज्जैन, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार नवीन उपस्थित होते. या दोन दिवसीय परिषदेत २४ देशांमधील एकूण ४,३३५ विद्यार्थी, संशोधक तसेच प्राध्यापक सहभागी झाले हाेते. ही परिषद पाच सत्रात पार पडली. यात मॉरिशस विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पोन्नादुराई रामास्वामी, सरदार पटेल विद्यापीठ आनंद गुजरात येथील डॉ. किरण कुमार सुरती, केंद्रीय विद्यालय तिरुवरूर तामिळनाडू येथील प्रा. एस. नागार्जुन, न्यानोमटेरियल लॅबोरेटरी, जागतिक संशोधन केंद्र कृष्णनकोईल येथील प्रा. एम. एस. स्वामीनाथन, कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील प्रा. डब्ल्यू. बी. गुरनुले यांनी विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण बोरकर, संयोजक डॉ. नीलेश गंधारे, प्रा. नीलेश जाधव, प्रा. कैलास मोरे, प्रा. डॉ. रीना मेश्राम, प्रा. डॉ. तृप्ती खेडकर, प्रा. डॉ. ए. बी. शर्मा, प्रा. डॉ. आय. एच. धडाडे, प्रा. डॉ. विकास बारसागडे, प्रा. डॉ. बिपीन काळबांडे, प्रा. एन. टी. कटरे, प्रा. डॉ. सचिन बहादे, प्रा. डॉ. आदिल जीवानी, प्रा. डॉ. वासवानी, प्रा. रेवतकर यांनी सहकार्य केले.