शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:20 PM

नागपूर महापालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊं डेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात नागपूरकरांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ७ फेब्रुवारीपासून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊं डेशन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात नागपूरकरांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विजय हुमने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव अनिल हिरेखण, डॉ. उदय गुप्ते, विकास मानेकर, अजय गंपावार, अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी ५ वाजता गायत्री नगर आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड येथील कविकुलगुरू कालिदास सभागृहामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापालिक आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित राहतील. उद्घाटनप्रसंगी ‘माय ओन गुड’ हा चित्रपट दाखविला जाणार आहे.आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा भारतीय चित्रपटामध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रसिद्ध चित्रपट निर्माते जाहनु बरुआ यांना ‘ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना ‘ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड येथील कविकुलगुरू कालिदास सभागृह व आयनॉक्स जयवंत तुली मॉल येथे चार दिवस सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत ३३ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या चित्रपटांचा लाभ घेता यावे यासाठी चार दिवसांसाठी ५० रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघामध्ये प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना नि:शुल्क चित्रपट पाहता येणार आहे. देशातील विविध प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक