शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

एनएडीटीमध्ये ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण : कर दुरुस्तीवर माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:11 PM

अज्ञात विदेशी मालमत्तेची तपासणी, सामान्य अहवाल मानक आणि कर लागू करण्याच्या कडक उपाययोजनांवर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे सोमवारीपासून सुरू झाले. उद्घाटन एनएडीटीचे प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात ब्रिक्सच्या पाच देशातील २२ प्रतिनिधी प्रशिक्षण घेत असून समारोप शुक्रवारी होणार आहे.

ठळक मुद्देब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका देशांचे प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अज्ञात विदेशी मालमत्तेची तपासणी, सामान्य अहवाल मानक आणि कर लागू करण्याच्या कडक उपाययोजनांवर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे सोमवारीपासून सुरू झाले. उद्घाटन एनएडीटीचे प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात ब्रिक्सच्या पाच देशातील २२ प्रतिनिधी प्रशिक्षण घेत असून समारोप शुक्रवारी होणार आहे. 

एनएडीटी दक्षिण आशियाई देशांमधील कर अधिकाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करते. पण पहिल्यांदाच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांतील कर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हा कार्यक्रम म्हणजे ब्रिक्स उच्चस्तरीय क्षमतेच्या बाईल्डिंग योजनेचा एक भाग आहे. यात भारताचे योगदान असून याकरिता एनएडीटीच्या प्रधान महासंचालक देशाच्या समन्वयक आहेत.प्रशिक्षणादरम्यान काळा पैशाचा धोका कमी करण्यासाठी भारताने केलेल्या आर्थिक सुधारणांची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे. यामध्ये माहितीचे आदानप्रदान, कर संहितांमध्ये सुधारणा, काळ्या पैशासंदर्भात नवीन कायदा, कर अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी, आंशिक आर्थिक अपहरण कायदा, बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा, आयकर कायदा १९६१ मधील दुरुस्ती आदींची माहिती देण्यात येत आहे.अकॅडमिक सत्रांसह प्रतिनिधींना भारताच्या सांस्कृतिक विविधतेची माहिती करून देण्याच्या उद्देशाने दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी भरतनाट्यम, कुचीपुडी, कथ्थक, गरबा, बिहू, भगरा या सारख्या नृत्यशैलीचे सादरीकरण करण्यात आले.

टॅग्स :NATIONAL ACADEMY OF DIRECT TAXESराष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीnagpurनागपूर