लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील वेगवेगळ्या भागात चाेरी करणाऱ्या आंतरराज्यीय टाेळीला अटक करण्यात कामठी (नवीन) पाेलिसांना यश आले. या चाेरट्यांकडून एकूण ८ लाख ७४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. ही कारवाई साेमवारी (दि. १२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अजय नजरू मंडलाेई (२१, रा. पटेलपुरा पपळवा, जि. धार मध्य प्रदेश), रमेश नरसिंग चव्हाण (३५, रा. गुडरिया, जि. धार), आलमसिंग सूरसिंग भुरिया (३५, रा. गुडरिया, जि. धार) व कमलेश गणेश प्रजापती (३४, रा. बाेरी, जि. अलीराजपूर, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांची नावे आहेत. १६ ऑक्टाेबर २०२० राेजी आशिष रामचंद्र भंडारवार (३०, रा. ऑरेंज सिटी पार्क, येरखेडा) यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी साेने-चांदीच्या दागिन्यांसह नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. सर्व मुद्देमाल घेऊन चाेरटे भाड्याने ऑटाे घेऊन नागपूर रेल्वेस्थानकावरून पळून गेले हाेते. या घटनेबाबत आशिष भंडारवार यांच्या तक्रारीवरून कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७, ४१४, ४११ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला हाेता. पाेलिसांनी परिसरातील ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार आराेपींचा शाेध घेण्यासाठी विविध पथके पाठविली हाेती. दरम्यान, सर्व आराेपी हे त्यांच्या गावी असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी चारही आराेपींना मध्य प्रदेशातून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून चाेरीचे १५० ग्रॅम साेन्याचे बिस्किट, पीबी-०८/डीटी-३०२२ क्रमांकाची पल्सर माेटारसायकल असा एकूण ८ लाख ७४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या चाेरट्यांकडून आणखी चाेरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे ठाणेदार विजय मालचे यांनी सांगितले. ही कामगिरी पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल, ठाणेदार विजय मालचे यांच्या मार्गदर्शनात दुय्यम पाेलीस निरीक्षक मंगेश काळे, सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, हवालदार पप्पू यादव, प्रमाेद वाघ, मनोहर राऊत, अनिल बाळराजे, राजेंद्र टाकळीकर, मंगेश लांजेवार, नीलेश यादव, सुधीर कनोजिया, ललित शेंडे, सुरेंद्र शेंडे, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता, भूपेंद्र आकाेटकर यांच्या पथकाने केली.