नागपूर : एका हॉटेलमधील आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणात हॉटेल संचालकासह पाच आरोपींना अटक केली आहे. तर विविध राज्यांतील पाच मुलींची सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.हिंगणा मार्गावरील बालाजीनगरात हॉटेल यश-२४ आहे. तेथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी एका डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संकेतस्थळावर संपर्क साधला. आरोपींनी डमी ग्राहकाला मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवले. मुलीची निवड झाल्यानंतर डमी ग्राहकाला हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. दोन मुलींमध्ये सौदा झाला. आरोपींनी डमी ग्राहकाकडून पैसे स्वीकारताच पोलिसांनी छापा टाकला. तिथे दोन मुली सापडल्या. तर आणखी तीन मुली दुसऱ्या हॉटेलमध्ये होत्या. तेथे जात पोलिसांनी त्यांचीदेखील सुटका केली.
पोलिसांनी यश दिपकराव बलोदे (२०, भट्टीपुरा, चांदुरबाजार, अमरावती), शुभम बलवंत मालखेडे (२२, भट्टीपुरा, चांदुरबाजार, अमरावती), संकेत विष्णू तितरमारे (२५, हिंगणा रोड), मनोज अरूण खंडारे (३६, इंदिरा माता नगर) व सागर मधुकर बिजवे (३१, अचलपूर, अमरावती) यांना अटक केली. तर त्यांचे साथीदार मनोज अग्रवाल व राहुल यांचा शोध सुरू आहे. आरोपी ग्राहकांकडुन पैसे घेऊन तरुणींकडून देहव्यापार करवून घेत होते. आरोपींच्या ताब्यातुन सहा मोबाईलसह १ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बलोदे व मालखेडे हे यश-२४ हे हॉटेल चालवितात. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, प्रकाश माथनकर, सचिन बडीये, शेषराव राऊत, अजय पौनिकर, आरती चव्हाण, अश्विन मांगे, समीर शेख, कुणाल मसराम, नितीन वासने, कमलेश क्षीरसागर व पुनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.परराज्यातील मुलींना विमानाने तिकीटआरोपी अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत होते. राहुल आणि गगन नावाच्या दलालांमार्फत तो परराज्यातून मुलींना वेश्याव्यवसायासाठी बोलवायचे. तरुणींना मुलींची विमानाची तिकिटे द्यायचे आणि राहण्याची व जेवणाची व्यवस्था करायची. संकेतस्थळाच्या माध्यमातून ते ग्राहकांशी संपर्क करायचे. तरुणींना प्रत्येक ग्राहकामागे अडीच ते तीन हजार रुपये देण्यात यायचे. उर्वरित रक्कम दलाल आणि आरोपी ठेवायचे. सुटका करण्यात आलेल्या तरुणी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथील आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी करारावर आणून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.