शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्ष घेणार मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 9:19 PM

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला राजकीय पक्ष सामोरे जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देराजकीय पक्षांकडे इच्छुकांची गर्दी : सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला राजकीय पक्ष सामोरे जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे भाजपासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना तिकीट देताना विशेष काळजी घेतली जात आहे.जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागवायलाही सुरुवात केली आहे. लवकरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अर्ज मागविण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होणारआहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांच्या जि.प. कार्यालयाकडे चकराही वाढल्या आहेत. त्यातच काँग्रेस व भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज स्वीकृतीनंतर तिकीट वाटपाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. काँग्रेसने शुक्रवारपर्यंत अर्ज मागविले होते तर भाजपने शनिवार ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. १ डिसेंबरपासून राकाँ व शिवसेनेकडूनही अर्ज वाटपाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे तिन्ही राजकीय पक्ष समन्वयाच्या भूमिकेत आहे. मात्र कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जात आहे. काही विधानसभा मतदार संघात विशिष्ट राजकीय पक्षाचे प्राबल्य असल्याने जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी करणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र उमेदवार जि.प. व पं.स. निवडणुकीत लढविण्याचे ठरविले आहे. उमेदवार निश्चिती भाजपा कोअर कमिटी करणारभारतीय जनता पक्षासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक जिकरीची झाली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी भाजपा तयारीला लागली आहे. उमेदवाराच्या निवडीसाठी भाजपाने कोअर कमिटी तयार केली आहे. पक्षाकडे आलेल्या अर्जाची तपासणी करून कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर संभावित उमेदवाराचा जि.प.सर्कलनिहाय सर्वे करण्यात येईल. नंतरच त्याची उमेदवारी निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक