न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:45 PM2018-01-13T22:45:13+5:302018-01-13T22:46:51+5:30
दिवंगत न्यायमूर्ती बृजगोपाल लोया यांचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याला न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू हे सुद्धा एक कारण आहे, तेव्हा या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी शनिवारी माजी मंत्री अनिस अहमद आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वात चितारओळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवंगत न्यायमूर्ती बृजगोपाल लोया यांचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याला न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू हे सुद्धा एक कारण आहे, तेव्हा या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी शनिवारी माजी मंत्री अनिस अहमद आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वात चितारओळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.
अनिस अहमद व अतुल कोटेचा यांनी सांगितले, सोहराबुद्दीन बोगस एन्काऊंटर प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा एक आरोपी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सुनावणी गुजरातबाहेर मुंबईच्या सीबीआयच्या न्यायालयात होत होती. न्यायमूर्ती लोया यांच्यामुळेच सुनावणी होत होती. नागपुरातील रविभवनात त्यांचा अचानक मृत्यू झाला. पत्रकार निरंजन टकले आणि न्यायमूर्ती लोया यांची बहीण अनुराधा बियाणी यांनी लोया यांचा मृत्यू ही सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे. देशभरात याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. तेव्हा केंद्र सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी.
यावेळी अशोक निखाडे, मुस्ताक हुसैन, वसीम खान, अॅड. ऋषी कोचर, लोकेश बरडिया, इरफान काजी, अल्लाउद्दीन अन्सारी, अश्विन झवेरी, हरीश भुतडा, प्रमोद शुक्ला, विनोद अफरेल, नितीन मलिक, नासीर खान, इमरान खान, अजय शाहू, शेख हसन, मोहम्मद कलाम, प्रमोद मोहाडीकर, शेख पौनीकर, मुस्तफा टोपीवाला, अजय सिंग, राजेश दुबे, प्रमोद जैन, नितीन जाजू, महेश निमजे, राजू भट्टाचार्य, राजेंद्र मुरारकर आदी निदर्शनात सहभागी होते.