लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोत्तम आर्थिक नियोजनासाठी व आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदार कायम संभ्रमात असतात. हा संभ्रम गुंतवणूकदारांना ‘निवेश महाकुंभ’ या कार्यक्रमाद्वारे शनिवारी दूर करता येणार आहे.रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात २४ मार्चला दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडने ही संधी उपलब्ध करून दिली आहे.पूर्वी केवळ बँकांमधील मुदत ठेवी अथवा फार-फार तर सोने-दागिन्यांपर्यंत मर्यादित असलेली गुंतवणूक आता अनेक प्रकारांनी वाढली आहे. यामुळेच गुंतवणूक बाजाराच्या या महासागरात सर्वसामान्य गुंतवणूकदार सैरभैर असतो. अशा या सैरभैर गुंतवणूकदारासाठी म्युच्युअल फंड सर्वोत्तम पर्याय आहे. यासोबतच एकूणच सर्वोत्तम परताव्याच्या गुंतवणुकीसाठी काय केले जावे, हे गुंतवणूकदारांना माहीत नसते. याबाबत शनिवार, २४ मार्चला होणाऱ्या कार्यक्रमात माहिती घेता येणार आहे.म्युचुअल फंडात फंड मॅनेजर हा हजारो गुंतवणूकदारांचा पैसा स्वत: गोळा करतो. तो शेअर बाजारातील विविध कंपन्यांमध्ये गुंतवतो. ज्या कंपनीत पैसा गुंतविण्यात आला आहे, त्या कंपनीचे शेअर्स वाढले काय किंवा घसरले काय, याच्याशी सर्वसामान्य गुंतवणूकदार या नात्याने आपण जोखीम पत्करायची नसते. ती सर्व जोखीम ही आपल्यावतीने पैसा गुंतविणारा फंड मॅनेजर स्वीकारतो.या सर्वाबाबत उद्योग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांकडून वैयक्तिक आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन होणार आहे. त्यामध्ये गुंतवणूक व अर्थव्यवस्थेसंदर्भात माहिती दिली जाणार आहे. वित्त पत्रकार विवेक लॉ, आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील हे मार्गदर्शन करतील. तसेच संपत्तीच्या चांगल्या नियोजनाबाबत डॉ. प्रमोद त्रिपाठी यांचेही मोलाचे मार्गदर्शन गुंतवणूकदारांना मिळेल.
‘निवेश महाकुंभ’ असा
- मुलांचे शिक्षण, कर नियोजन, सेवानिवृत्तीची योजना व पैशांचे नियोजन यावर माहिती
- स्थान : कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग
- वेळ : दुपारी ४ वाजता
- दिनांक : २४ मार्च २०१८