शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

‘वेकोलि’ करणार साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Published: October 27, 2015 3:56 AM

डबघाईस आलेल्या ‘वेकोलि’ने (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) परत भरारी घेतली आहे. ‘वेकोलि’कडून येत्या पाच वर्षांत

नागपूर : डबघाईस आलेल्या ‘वेकोलि’ने (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) परत भरारी घेतली आहे. ‘वेकोलि’कडून येत्या पाच वर्षांत साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा, ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. ‘वेकोलि’च्या नागपूर मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला सोमवारी गोयल यांनी संबोधित केले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘वेकोलि’चे ‘सीएमडी’ राजीव रंजन मिश्रा हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वेकोलि’तर्फे २४ महिन्यांत २४ खाणी उघडण्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या १० महिन्यांत १० नवीन खाणी उघडण्यात यश आले आहे. २०१९-२० पर्यंत ‘वेकोलि’कडून नवीन खाणी उघडणे तसेच जुन्या खाणींच्या देखभालीसाठी ६ हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ‘वेकोलि’ने या वर्षी ४५ मिलियन टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे असे गोयल यांनी सांगितले. देशात सत्ताबदल झाल्यापासून ‘कोल इंडिया’नेदेखील प्रगती केली असून गेल्या वर्षभरात ३२ मिलियन टन कोळशाचे अतिरिक्त उत्पादन झाले. यंदाच्या वर्षी एकूण ५५० मिलियन टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट असून पहिल्या सहा महिन्यांतच ९ टक्के वाढ दिसून आली आहे. ‘कोल इंडिया’ नक्कीच उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रातदेखील विशेष लक्ष देण्यात येत आहे. ५० टक्के वायूआधारित ऊर्जाप्रकल्प परत सुरू झाले आहे. याशिवाय दाभोळ ऊर्जाप्रकल्प सुरू करण्याचे केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचेदेखील प्रतिपादन त्यांनी केले. (प्रतिनिधी)वर्षभरात १५ कोटी ‘एलईडी’ बल्ब देणारऊर्जा मंत्रालयातर्फे देशभरात स्वस्त दरात ‘एलईडी’ बल्ब उपलब्ध करून देण्यात येत आहे. ३१० रुपयांचा बल्ब ९० ते १०० रुपयांना ग्राहकांना देण्यात येत आहे. आतापर्यंत २ कोटी १४ लाख ‘एलईडी’ बल्ब विकण्यात आले असून येत्या वर्षभरात १५ कोटी बल्ब ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.नोव्हेंबरपासून ‘इको’ पर्यटनपर्यटन आणि पर्यावरण यांना एकत्र जोडण्यासाठी ‘इको’ पर्यटनाची संकल्पना पीयूष गोयल यांनी मांडली. सावनेरमध्ये मार्च महिन्यात वेकोलिच्या ‘इको पार्क’चे भूमिपूजन करण्यात आले होते. याची सुरुवात नोव्हेंबरपासून होईल व यात झीरो माईल, आदासा मंदिर, सावनेर खाण, इको पार्क, गोंडेगाव खाण यांचा समावेश असेल. विद्यार्थी व नागरिकांना याअंतर्गत प्रत्यक्ष खाणीचे कार्य, ऊर्जा प्रकल्प पाहण्याची संधी मिळेल. देशभरातदेखील अशा प्रकारे ‘इको पार्क’ उभारण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.