रात्री १० पर्यंत सुरू राहताे देवनगर बाजार
नागपूर : देवनगर चाैकात रात्री १० वाजतापर्यंत भाज्यांची दुकाने लागली असतात. भाजी घेण्यासाठी रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी लागलेली असते. कुणाचीही राेक-टाेक नसल्याने विनामास्क गर्दी करून काेराेना संसर्गाला आमंत्रण देत आहेत. प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी जागरुक नागरिकांनी केली आहे.
अपूर्ण काम, लावले बॅरिकेट
नागपूर : यशवंत स्टेडियमजवळ धंताेली राेडवर मागील १५ दिवसांपासून काम अपूर्ण पडले आहे. खाेदलेल्या रस्त्यावर बॅरिकेट लावण्यात आले आहेत. येथील रस्ता वन वे असल्याने जाम लागून वाहतुकीचा खाेळंबा हाेत असताे. काम अपूर्ण साेडून बॅरिकेट लावल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बॅरिकेटच्या आसपास वाहनचालक वाहन पार्क करून ठेवत असल्याने या त्रासात अधिक भर पडत आहे.
शिवाजीनगरवासीयांना पाण्याची समस्या
नागपूर : तुकडाेजी पुतळा परिसरातील शिवाजीनगरात दरराेज पाणी मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागताे आहे. नागरिकांच्या मते आधी वस्तीत दाेन सरकारी नळ हाेते पण ते बंद करण्यात आले. शिवाजीनगरच्या समता भवन मंदिराजवळ असलेल्या नळावरूनच महिला पाणी भरत असतात. येथे केवळ नळाला तासभर पाणी मिळते. अनेक कुटुंबांना पिण्याला पाणी मिळत नाही. वस्तीत टँकरही येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते.