लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. मोर्चात सहभागी महिला परिचरांच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री जयंत पाटील यांना निवेदन सादर केले. सचिवांची बैठक घेऊन मुंबईत चर्चेला बोलावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या महिला परिचर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी टेकडी मार्गावर नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. अशोक थुल, उमेशचंद्र चिलबुले, मंगला मेश्राम, मंजुळा बांगर, आकांक्षा कांबळे, सुनिता सावंत यांच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्रिमहोदयांनी निवेदनातील मागण्यांबाबत सचिवांची बैठक घेऊन संघटनेला मुंबईत चर्चेसाठी बोलाविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिला परिचरांनी हा मोर्चा मागे घेतला.नेतृत्व : अशोक थूल, उमेशचंद्र चिलबुले, मंगला मेश्राम, मंजुळा बांगर, आकांक्षा कांबळे, सुनिता सावंतमागण्या :१) महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घ्या२) मासिक वेतन १८ हजार रुपये द्यावे३) लसीकरण सत्राचे परिश्रमिक द्यावे४) शस्त्रक्रिया शिबिरात रात्रपाळी लावणे बंद करावे५) गृह भेटीसाठी प्रवास खर्च द्यावा
महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:15 AM
महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने विधानभवनावर भव्य मोर्चा काढला.
ठळक मुद्देजिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा मोर्चा