शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

रेशन दुकानात मिळणार आता आयोडिनयुक्त मीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:57 AM

गरीब कुटुंबात आयोडिनयुक्त मिठाच्या सेवनाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता सरकारी रेशन दुकानामध्ये आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ठळक मुद्देबाजारमूल्यापेक्षा कमी दरआवश्यकतेबद्दल ३० टक्के नागरिक अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीब कुटुंबात आयोडिनयुक्त मिठाच्या सेवनाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता सरकारी रेशन दुकानामध्ये आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. जुलै महिन्यापासून कार्डधारकांना आयोडिनयुक्त मीठ बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात सुरुवात झाली आहे. शरीरात आयोडिनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने हे पाऊल उचलले आहे. आयोडिनयुक्त मीठ हे साधारण मिठापेक्षा महाग आहे. गरीब परिवार महाग असलेले मीठ खरेदी करीत नाहीत. राज्यात ७० टक्के नागरिक आयोडिनयुक्त मिठाचे सेवन करतात. आयोडिनची शरीराला आवश्यकता असल्याचे अज्ञान असल्याने आजही ३० टक्के लोक साधारण मिठाचे सेवन करतात.

का आहे आयोडिनची आवश्यकता?मानवी शरीराला आयोडिनची नियमित आवश्यकता असते. आयोडिनच्या कमतरतेमुळे मुलांचा बौद्धिक विकास खुंटतो, महिलांना गलगंड व शारीरिक वृद्धी खुंटते. त्याचबरोबर आयोडिनच्या कमतरतेमुळे गर्भातील शिशूवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. महिलांमध्ये वेळेपूर्वी प्रसूतीची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी दररोज २०० मायक्रोग्रॅम तसेच ६ ते १२ वर्षांच्या मुलांनी १२० मायक्रोग्रॅम, १२ ते अधिक वयाच्या मुलांनी १५० मायक्रोग्रॅम आयोडिन सेवन करण्याची आवश्यकता आहे. आयोडिन मिठामुळे आपण ही कमतरता भरून काढू शकतो.तूर डाळ ३५ रुपये किलोगेल्या वर्षी राज्यात तुरीचे बम्पर उत्पादन झाले होते. त्यामुळे रेशन दुकानात तूर डाळ वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. मे महिन्यात ५५ रुपये किलो तूर डाळ उपलब्ध केली. परंतु बाजारातील किंमत व रेशन दुकानातील किमतीत जास्त अंतर नसल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरकारने ३५ रुपये किलो तूर डाळ वितरित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अन्न पुरवठा विभागातून मिळाली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य