शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

एप्रिल ते सप्टेंबरमध्ये आयपीपीबीचे १२१ कोटींचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 11:36 PM

IPPB transactions, Nagpur news कोरोना महामारीच्या काळात डाक विभागाने लोकसेवेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. इंडियन पोस्टल पेमेंट बँक (आयपीपीबी) ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून विभागाने एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात ३ लाख ७२ हजार ९९७ आधार संलग्नित पेमेंट सर्व्हिसद्वारे १२१ कोटी ६४ लाख रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देपोस्टमास्टर जनरल जायभाये यांची माहिती : विभागात उघडली साडेसात लाख आयपीपीबी खाती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीच्या काळात डाक विभागाने लोकसेवेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. इंडियन पोस्टल पेमेंट बँक (आयपीपीबी) ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून विभागाने एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात ३ लाख ७२ हजार ९९७ आधार संलग्नित पेमेंट सर्व्हिसद्वारे १२१ कोटी ६४ लाख रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी शुक्रवारी दिली. नागपूर विभागात आतापर्यंत आयपीपीबीची साडेसात लाख बँक खाती उघडल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान चालणाऱ्या ‘राष्ट्रीय  टपाल सप्ताह’ उत्सवाचे आयोजन नागपूर क्षेत्रातर्फे करण्यात आले आहे. यावेळी जायभाये यांनी विभागाच्या प्रगतीची माहिती दिली. पोस्टल जीवन बीमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, नागरिक बचत योजना ,किसान विकास पत्र यासारख्या योजना खेड्यापाड्यातील सामान्य नागरिकांसाठी लाभदायक असून त्या पोहचविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त टपाल सेवा नागपूरचे संचालक पवन कुमार डालमिया यांच्याहस्ते प्रचारासाठी कार्यालयीन वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सहायक संचालक शशीन राय उपस्थित होते. जायभाये यांनी सादरीकरणातून योजनांची माहिती दिली. नागपूर क्षेत्रात २४९ आधार अद्ययावतीकरण आणि नोंदणी केंद्र असून ३० सप्टेंबरपर्यंत या केंद्रावर ३ लाख ८९ हजार ९७ व्यवहार करण्यात आले. त्यांनी पंचतारांकित गावांच्या योजनेबाबत सांगितले, नागपूर क्षेत्रात सुकन्या योजनेअंतर्गत २८ गावे पूर्ण झाले असून पीएलआय ग्राम म्हणजे संपूर्ण बीमा ग्राम योजनेअंतर्गत २१६ गावे विमा ग्राम म्हणून समाविष्ट झालेली आहेत.५४ हजार पासपोर्ट अर्जावर प्रक्रियापोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांनासुद्धा प्रतिसाद मिळत असून नागपूर लोकसभा क्षेत्रात पासपोर्ट सेवा केन्द्र कार्यरत झाले आहेत. आतापर्यंत या पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ५४ हजार ९०४ पारपत्रांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात आली आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसnagpurनागपूर