लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसमुळे मजूर, कष्टकऱ्यांवर संकट कोसळले आहे. लॉक डाऊनमुळे काम बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना एकवेळचे भोजनही मिळत नसल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) पुढाकार घेतला आहे. विविध रेल्वे झोनच्या अंतर्गत विभागात सुरु असलेल्या बेस किचनमध्ये भोजन तयार करून ते शहरातील गरजुंना वितरीत करण्याची तयारी ‘आयआरसीटीसी’ने सुरु केली आहे. त्यासाठी ‘आयआरसीटीसी’ स्थानिक प्र्रशासनाची मदतही घेणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार आयआरसीटीसीतर्फे विविध रेल्वे विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून याबाबत त्यांच्या सुचना मागविण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर संचालित कमसम रेस्टॉरंटच्या माध्यमातून भोजन तयार करण्यात येणार आहे. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनच्या नागपूर विभागातील गोंदिया रेल्वेस्थानकाचाही यात समावेश आहे. याशिवाय झोनमधील बिलासपूर, दुर्ग आणि रायपूर विभागातील किचनमध्येही भोजन तयार करण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे झोनच्या नांदेड रेल्वेस्थानकावरील फुड प्लाझामधुनही भोजन वितरीत करण्याबाबत चर्चा सुरु आहे.आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांची घेणार मदतभोजन वितरीत करण्याच्या कामात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्र्ग पोलिसांची मदतही ‘आयआरसीटीसी’ने मागितली आहे. सोबतच या कामासाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे. ‘आयआरसीटीसी’च्या किचन युनिटमध्ये १५ दिवसांचा स्टॉक ठेवण्यात येईल. सोबतच आयआरसीटीसीच्या कर्मचाºयांना कामावर येण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून खाजगी वाहनांसाठी परवानगी घेण्यात येणार आहे.‘आयआरसीटीसी’ सोबत चर्चा सुरु आहे‘आयआरसीटीसीच्या बेस किचनमधुन गरजू नागरिकांना भोजन वितरीत करण्याबाबत चर्चा सुरु आहे. आदेश मिळताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने आयआरसीटीसीच्या कर्मचाºयांना गरजेच्या वस्तु उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या ३४ वाणिज्य निरीक्षक मिळून रेल्वेस्थानक परिसरातील गरजू नागरिकांना भोजन पुरविण्यात येत आहे. त्यासाठी येणारा खर्च रेल्वे अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.’-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग